ठळक मुद्देरकुलचा ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट गत १७ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाने ७५ कोटींचा आकडा पार केला आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण, तब्बू आणि रकुलचा हा चित्रपट सध्या बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. एकीकडे या चित्रपटातील रकुलच्या अभिनयाचेही कौतुक होतेय. पण दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र रकुल जोरदार ट्रोल होतेय. याचे कारण काय तर रकुलने शेअर केलेला फोटो.
होय, रकुलने शेअर केलेल्या या फोटोने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. या फोटोत रकुलने स्लीवलेस टॉप व जीन्समध्ये पाज दिलीय. मोकळ्या केसांत ती कमालीची सुंदर दिसतेय. पण या फोटोतील एक गोष्ट मात्र युजर्सला जाम खटकलीय. ती म्हणजे, रकुलच्या जीन्सची उघडी झीप. या फोटोला रकुलने ‘गर्ल्सपॉवर’ या हॅशटॅगसह शेअर केले आहे.


लोकांनी रकुलचा हा फोटो पाहिला आणि अनेकांचे माथे ठणकले. मग काय लोकांनी रकुलचा चांगलाच समाचार घेतला. ‘असले अश्लिल फोटो शेअर करत जाऊ नकोस,’ असे एका युजरने तिला सुनावले. ‘याला तू गर्ल्स पॉवर म्हणतेस, लाज बाळग,’ अशा शब्दांत अन्य एका युजरने तिला फैलावर घेतले. एकंदर काय तर गर्ल्स पॉवर दाखवण्याच्या नादात रकुलने स्वत:चेच हसे करून घेतले.

रकुलचा ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट गत १७ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाने ७५ कोटींचा आकडा पार केला आहे.पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुस-या आठवड्यात देखील चित्रपटाने चांगला गल्ला जमवला. या चित्रपटाचे हे कलेक्शन पाहाता हा चित्रपट लवकरच १०० करोडचा टप्पा पार पाडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


Web Title: rakul preet singh troll unbuttoned jeans
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.