rakhi sawant working on dance number but hero disappointed her | राखी सावंतचा इंटिमेट व्हिडीओ व्हायरल, हिरोला म्हटले ‘ठंडा’

राखी सावंतचा इंटिमेट व्हिडीओ व्हायरल, हिरोला म्हटले ‘ठंडा’

ठळक मुद्देराखीने गतवर्षी सीक्रेट मॅरेज केल्याचे जाहिर केले होते.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या सीक्रेट वेडिंगमुळे चर्चेत आहे. पण चर्चेने किती काळ पोट भरणार? म्हणून की काय, आता मात्र राखी पुन्हा एकदा कामात बिझी झालीय. राखी सध्या एका डान्स नंबरचे शूटींग करतेय. या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ राखीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या मेकिंग व्हिडीओसोबत राखीने कुठलेही डिटेल्स शेअर केलेले नाहीत. पण हो, हिरोबद्दल मात्र ती बोलली. हिरोला तिने ‘ठंडा’ म्हटले.
या व्हिडीओत राखी रेड कलरचा ड्रेस घालून वाळवंटात एका रोमॅन्टिक सीक्वेंन्सचे शूट करतेय. पण व्हिडीओत तिच्यासोबत दिसत असलेला हिरो मात्र कमालीचा नर्व्हस दिसतोय. अगदी राखीला वैताग यावा इतका नर्व्हस. राखीने व्हिडीओ शेअर करतान हा वैताग बोलून दाखवला.

‘कैसा हिरो है, फ्रिज से भी ज्यादा ठंडा,’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले. आता राखीने असे का लिहिले यासाठी तुम्हाला हा व्हिडीओच पाहावा लागेल. राखीच्या या व्हिडीओवर लोकांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत.


राखीला पाहून कदाचित तो अ‍ॅक्टिंग विसरला असेल, अशी प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने दिली. अन्य एक युजर मात्र यावरून राखीची मजा घेताना दिसला. ‘आता त्याच्या समोर अशी हिरोईन असेल तर बिचारा तो तरी काय करणार?’ असे या युजरने लिहिले.


राखीने गतवर्षी सीक्रेट मॅरेज केल्याचे जाहिर केले होते. यानंतर नववधूच्या पोशाखातील अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा तिने लावला होता. अर्थात अद्याप राखीचा पती कोण, कुठला हे कुणालाही ठाऊक नाही.

Web Title: rakhi sawant working on dance number but hero disappointed her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.