ठळक मुद्देराखीने नुकतेच मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले.

रोज नव्या ड्राम्यामुळे चर्चेत राहणारी राखी सावंत सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. आपल्या आयुष्याबद्दलच्या रोज नव्या अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच राखीने गुपचूप लग्न केले. आता   कायमची सासरी जाण्याची तयारी तिने केली आहे. होय, राखीचा पती राकेश हा युकेचा आहे. राखीनेही नेहमीसाठी त्याच्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण हो त्याआधी आपल्या चाहत्यांसाठी राखीने एक तजवीज करून ठेवली आहे. होय, राखी गेल्यानंतर तिची जागा तिची आई घेणार आहे. आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. 


मी कायमचे सासरी निघून गेल्यावर माझी आई चाहत्यांचे मनोरंजन करेल असे तिने म्हटले आहे. यासाठी तिच्या आईचे टिक टॉकवर नवीन खातेही सुरु करण्यात आले आहे. राखीने आपल्या आईचे काही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ‘अभिनंदन मम्मी, तू टिकटॉकवर आलीस. मी माझ्या  ातीसमवेत युकेला स्थायिक होईल, तेव्हा माझी आई चाहत्यांच्या  करमणुकीची जबाबदारी स्वीकारेल. चाहत्यांना मला तुमची प्रचंड काळजी आहे,’असे राखीने हे व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.


राखीने नुकतेच मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले. आधी तिने ही बातमी नाकारली. माझ्या लग्नाची बातमी खोटी आहे. मी त्या हॉटेलात ब्राईडल फोटोशूटसाठी गेले होते, असे सांगून राखीने नेहमीप्रमाणे ‘ड्रामा’ केला. पण  शेवटी लग्न मी लग्न केले, अशी कबुली तिने दिली होती.

अर्थात अद्यापही राखीचा हा एनआरआय पती कोण, कुठला, तो दिसतो कसा हे कुणालाही ठाऊक नाही. राखीने अद्याप त्याचा एकही फोटो शेअर केलेला नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rakhi sawant welcomes her mother on tiktok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.