राखी सावंत सध्या सोशल मीडियावर कोणत्याना कोणत्या गोष्टीला घेऊन चर्चेत असते. राखीने पुन्हा एकदा एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीने लग्नाला घेऊन मोठा खुलासा केला आहे.  राखीने एनआरआय रितेशसोबत सीक्रेट मॅरेज केले आहे. मात्र या व्हिडीओत राखीने पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. 


राखीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी तिच्या पहिल्या पतीचे नाव सांगतेय हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. यात राखीने बिग बॉस सीझन 1 हा आपला पती असल्याचे सांगतेय ज्यात राखी स्वत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.   काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 13’च्या वादात राखी सावंतनेही उडी घेतली आहे. ‘बिग बॉस 13’मध्ये तिच्या नावाचा उल्लेख झाल्या होता. 

यावर राखी चांगलीच संतापली होती. शहनाज गिलच्या ड्रामेबाजीला कंटाळून  शेफाली जरीवालाने शहनाजला ‘पंजाबची राखी सावंत’ असे म्हटले होते. नेमक्या याच कारणावरून राखी भडकली आहे. राखीने यासंदर्भात एक नाही तर तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. सलमान खान तू हे होऊच कसे दिलेस? असा सवाल तिने या व्हिडीओ केला आहे. त्यावर राखी म्हणाली होती की,  ‘बिग बॉस 13’मध्ये माझी टिंगल केली जाते, मला बदनाम केले जाते, म्हणजे काय? असा संतप्त सवाल तिने केला होता.  विशेष म्हणजे, केवळ ‘बिग बॉस 13’वर नाही तर हा शो होस्ट करणारा सलमान खान याच्यावरही राखीने आपली भडास काढली होती.  

Web Title: Rakhi sawant reveals her first husband name bigg boss 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.