ठळक मुद्देराखीने अलीकडेच एका एनआरआयशी गूपचूप लग्न केले.

आपल्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत राहणा-या राखी सावंतने असे काही केले की, सगळ्यांना एकच प्रश्न पडला. तो म्हणजे, राखीचे लग्न मोडले का?  सोशल मीडियावर हा एकच प्रश्न तिला विचारला जाऊ लागला.
राखीने इन्स्टाग्रामवर एकापाठोपाठ एक असे तीन फोटो शेअर केलेत. अर्थात या फोटोत राखी नाही तर एक मुलीचा अ‍ॅनिमेटेड चेहरा आहे. फोटोतील ही मुलगी रडताना दिसते आहे. राखीने शेअर केलेले हे फोटो पाहून सोशल मीडिया युजरने राखीला प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडले.

‘राखी, तुझे लग्न मोडले का?’ असा सवाल अनेकांनी तिला केला. अनेक युजर्सनी ‘काय घटस्फोट झाला?’ असे तिला विचारले. तर अनेकांनी तिला हा सगळा ड्रामा थांबवण्यास सांगितले.

‘राखी कधी तर गंभीर हो. कधी लग्न, कधी दीपक कलाल. ही ड्रामेबाजी आत्तातरी थांबव. याने तू स्वत:ची इमेज खराब करतेय,’ असे एका युजरने तिला लिहिले.


अखेर राखीने युजरच्या प्रश्नांना उत्तर दिलेच. ‘युकेचे तिकिट खूप महाग आहे, म्हणून रडतेय,’ असे तिने सांगितले.  राखीचा पती हा युकेला राहतो. साहजिकच तिकिट महाग असल्याने ती युकेला जाऊ शकत नाही. हेच कारण आहे की ती रडतेय.
राखीने अलीकडेच एका एनआरआयशी गूपचूप लग्न केले. आधी लग्नाची बातमी तिने नाकारली आणि नंतर होय, मी लग्न केले, अशी कबुली दिली. तिच्या पतीचे नाव रितेश आहे, हेही तिने सांगितले. गत 29 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. लग्नाची बातमी लपवून ठेवण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये लग्न केले गेले होते.


Web Title: rakhi sawant posted sad photo on instagram social media users asked about divorce
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.