राखी सावंतने भीक मागणाऱ्या मुलांना दिले नारळ पाणी, म्हणाली - 'आईला सांग कमी बाळांना जन्म दे'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:07 PM2021-04-13T19:07:10+5:302021-04-13T19:07:38+5:30

राखी सावंतचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत असतो. हा व्हिडीओ पाहून लोक राखीचे खूप कौतूक करत आहेत.

Rakhi Sawant gives coconut water to begging children, says - 'Tell mother to give birth to fewer babies' | राखी सावंतने भीक मागणाऱ्या मुलांना दिले नारळ पाणी, म्हणाली - 'आईला सांग कमी बाळांना जन्म दे'

राखी सावंतने भीक मागणाऱ्या मुलांना दिले नारळ पाणी, म्हणाली - 'आईला सांग कमी बाळांना जन्म दे'

googlenewsNext

अभिनेत्री राखी सावंत नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. राखी जिथे कुठे जाते तिथे पापाराझी तिला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतात आणि तिचा ड्रामा लोकांना हसायला भाग पाडतो. मात्र यावेळी राखीने हलक्या फुलक्या अंदाजात मोठी शिकवण दिली आहे. राखी सावंतचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत असतो. हा व्हिडीओ पाहून लोक राखीचे खूप कौतूक करत आहेत.


राखी सावंतने असे काय म्हटले की तिचे इतके कौतुक होत आहे. खरेतर राखी काही मुलांसोबत स्पॉट झाली. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना राखी सावंतने नारळ पाणी पाजले आणि फळ खाऊ घातले. सोबत राखीने या मुलांना खूप प्रेमाने काही गोष्टी समजावून सांगितल्या.


राखी सावंतने या मुलांना शाळेत जाण्याचा सल्ला दिला. राखी म्हणाली की, शाळेत जा, काम करा पण भीक मागू नका. भीक मागणे चांगली गोष्ट नाही, ही चुकीचे काम आहे. जेव्हा राखी या मुलांना भीक मागण्यासाठी मनाई केल्यावर मुले सांगू लागले की घरी छोटे छोटे भाऊ आहेत, त्यांच्या खाण्यासाठी भीक मागावी लागते. त्यावर पुन्हा राखी सावंतने त्यांना समजावले.


राखी सावंत मुलांना म्हणाली की, तुमच्या आईला सांगा की बाळांना जन्म देऊ नको. रस्त्यावर भीक मागणे चुकीचे आहे. राखीचा हा व्हिडीओ समोर येताच खूप व्हायरल झाला आहे. लोक राखीचे खूप कौतूक करत आहेत. कुणी राखीला मोठ्या मनाची म्हणत आहे तर कोणी राखीचा सल्ला फॉलो करायला सांगत आहे.


राखी सावंत शेवटची बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये दिसली होती. या शोमधून तिने लोकांचे खूप मनोरंजन केले होते. याशिवाय राखी तिचे लग्न आणि नवऱ्यामुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

Web Title: Rakhi Sawant gives coconut water to begging children, says - 'Tell mother to give birth to fewer babies'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.