'सेक्रेड गेम्स'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बोल्ड सीन दिल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री राजश्री देशपांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. 

राजश्री देशपांडे हिने इंस्टाग्रामवर न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती अर्धी दिसते आहे आणि तिच्यासोबत हातात छोटे
घड्याळही दिसत आहे.  

राजश्री देशपांडे ही मुळची औरंगाबाद शहरातील आहे. पुणे शहरातील सिंबायोसिस कॉलेजमधून तिने लॉ ची डिग्री घेतली तर त्याच कॉलेजमधून तिने अॅडव्हरटायझिंगमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.


राजश्रीने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं ते २०१२ साली. आमिर खानच्या 'तलाश' सिनेमात तिला एक छोटी भूमिका मिळाली होती. त्यानंतर राजश्रीने मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. 'कुछ तो लोग कहेंगे' या मालिकेत तिने काम केले.त्यानंतर पुन्हा राजश्री मोठ्या पडद्याकडे परतली. यावेळी तिला सलमान खानच्या 'किक' सिनेमात काम मिळालं. पण ही सुद्धा भूमिका लहान होती. पुढे तिने 'हरम' या मल्याळम सिनेमात काम केलं. यात तिला डबल रोल साकारायला मिळाला. 


राजश्री सर्वात जास्त चर्चेत आली ती जेव्हा वादग्रस्त ठरलेल्या 'सेक्सी दुर्गा' मध्ये मुख्य दुर्गाची भूमिका साकारली होती. या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले.


त्यानंतर राजश्रीने तिचं डिजिटल डेब्यू केलं ते बीबीसीच्या 'वन्स माफिया' मधून. त्यानंतर सेक्रेड गेममधील भूमिकेतून ती लोकप्रिय झाली. राजश्रीने ही नंदीता दासच्या 'मंटो' मध्येही एक महत्वाची भूमिका साकारली होती. यातही नवाझुद्दीन मुख्य भूमिकेत होता.

Web Title: Rajshri Deshpande shared nude photo on instagram, she was seen in Sacred Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.