Rajkumar rao is the biggest fan of shahrukh khan said i am an actor because of him | बाबो! शाहरुख खानमुळे अभिनेता बनला राजकुमार राव, अशी झाली होती पहिली भेट

बाबो! शाहरुख खानमुळे अभिनेता बनला राजकुमार राव, अशी झाली होती पहिली भेट

राजकुमार राव लवकरच प्रियंका चोप्रासोबत ‘द व्हाईट टायगर’मध्ये झळकणार आहे. यात तो अशोक नावाची भूमिका करणार आहे. 
राजकुमार रावची गणना आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमारच्या अभिनय आणि स्टायलचे लाखो दिवाने आहेत. अभिनेता राजकुमार राव म्हणतात की, जर तो आज अभिनयाच्या क्षेत्रात असेल तर केवळ शाहरुख खानमुळे आहे. तो म्हणतात की, एक व्यक्ती आणि अभिनेता म्हणून त्याने शाहरुख खानकडून बरेच काही शिकले आहे. शाहरुख खानला तो आपलं आदर्श मानतो. 

राजकुमार राव म्हणाला, 'शाहरुख खानमुळे मी आज एक अभिनेता झालो आहे. मी त्याला नेहमी पडद्यावर पाहिले आणि फक्त त्याच्यामुळेच मी इंडस्ट्रीमध्ये आलो. यामागचे कारण म्हणजे मला त्याच्या या प्रवासात सामील व्हायचे होते. त्याने मला शिकवले आहे की जर आपण एक स्वप्न पाहिले असेल तर त्याबद्दल मनापासून काम करा, मग ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. '

शाहरुख खानला राजकुमार राव पहिल्यांदा क्वीन सिनेमा हिट झाल्यानंतर भेटला होता. त्यांची भेट मेहबुब स्टुडिओत झाली होती. राजकुमार सांगतो,मी त्याला भेटलो त्यावेळी त्याला माझ्याविषयी सगळे काही माहीत होते. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. पण याच सगळ्या गोष्टी त्याला खास बनवतात असे मला वाटते. मी आज त्याला कधीही फोन, मेसेज करू शकतो. तो देखील मला अनेकवेळा फोन करतो. पण आजही मी त्याचा खूप मोठा फॅन असून त्याला भेटल्यावर, त्याच्याशी फोनवर बोलताना मला तितकाच आनंद होतो. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rajkumar rao is the biggest fan of shahrukh khan said i am an actor because of him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.