दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबतचे फोटो रोडिज फेम राजीव लक्ष्मणने डिलीट केले आहेत. शुक्रवारी राजीवने रिया चक्रवर्तीसोबतचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोत ते दोघे खूप खूश दिसत होते. रिया व राजीवचा पार्टीतला हा फोटो व्हायरल होताच, सुशांतचे चाहते भडकले. राजीवने रियाला ‘माय गर्ल’ संबोधल्याने तर सुशांतच्या चाहत्यांचा पारा आणखीच चढला. यानंतर चाहत्यांनी रिया व राजीव दोघांनाही जबरदस्त ट्रोल केले. त्यानंतर लगेच त्याने ते फोटो डिलीट केले. याशिवाय त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली. नवीन पोस्टमध्ये त्याने कमेंट्सचे ऑप्शन डिसेबल केले आहे.


ट्रोल होताच राजीवने रियासोबतचा फोटो डिलीट केला. मात्र रियासाठी त्याने एक खास पोस्ट शेअर केली. रिया माझी जुनी प्रिय मैत्रिण आहे. तिला पुन्हा भेटून आनंद झाला. तिला शुभेच्छा, असे त्याने लिहिले. अर्थात यासोबतचे कमेंट्चे आॅप्शन त्याने बंद ठेवले.


राजीव लक्ष्मणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, एका पोस्टमध्ये मी काही गैरजबाबदार शब्दांचा वापर केला होता. मला वाटते की त्यामुळे उगाचच वाद पेटला होता. रिया माझी जुनी मैत्रिण आहे. पुन्हा एकदा तिला भेटून आनंद झाला. रियाला शुभेच्छा. 


सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती कोणत्यातरी इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. सुशांतच्या निधनानंतर रियाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. 


ड्रग्जप्रकरणी अटक झाल्यानंतर रिया जवळपास महिनाभर तुरूंगात होती. सध्या ती जामीनावर आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बरेच दिवस रिया पार्ट्या, मिटींग्सपासून दूर होती. आता दीर्घकाळानंतर रियाचे आयुष्य पूर्वपदावर आलेले दिसतेय. सध्या रियाचे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rajiv Lakshman Deletes Pictures With Rhea Chakraborty, Issues An Apology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.