राज कुंद्राची पहिली पत्नीही आहे कोट्यावधीची मालकीण, मग का झाला शिल्पा शेट्टीवर लट्टू, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:05 PM2021-07-30T19:05:36+5:302021-07-30T19:12:39+5:30

शिल्पाला इंम्प्रेस करण्यासाठी लग्नाआधीच राजने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरच आलिशान बंगला खरेदी केला होता. राज कुंद्राने जेव्हा हे सरप्राईज शिल्पाला दिले तेव्हा तिनेही आनंदाच्या भरात फार काही विचार न करता लग्नासाठी होकार दिला होता.

Raj Kundra's ex wife is also a successful business women, then why He left her and chose Shilpa Shetty, know here | राज कुंद्राची पहिली पत्नीही आहे कोट्यावधीची मालकीण, मग का झाला शिल्पा शेट्टीवर लट्टू, जाणून घ्या कारण

राज कुंद्राची पहिली पत्नीही आहे कोट्यावधीची मालकीण, मग का झाला शिल्पा शेट्टीवर लट्टू, जाणून घ्या कारण

Next

शिल्पा शेट्टी पति राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक केल्यानंतर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.दिवसेंदिवस या प्रकरणाबाबतची नवीन नवीन माहिती समोर येत आहे. राज कुंद्राचे भारतातच नाही तर परदेशातही कंपन्या आहेत.  2800 कोटी संपत्तीचा मालिक असलेला राज कुंद्राकडे  23 कंपन्या आहते. पत्नी शिल्पा शेट्टी काही कंपनींची मालकीन आहे. तर त्यापैकी ९ कंपनीचा स्वतः राज कुंद्रा मालिक आहे.

या प्रकरणात शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली गेली. पोर्नोग्राफी तयार करण्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नवरा सहभागी नसल्याचे अभिनेत्रीने आपल्या जबाबात म्हटले आहे. तिने हे देखील नमूद केले की इरोटिका पोर्नपेक्षा वेगळी आहे, ज्याचे वितरण केल्याचा आरोप तिच्या पतीवर केले गेले आहेत.या प्रकरणामुळे राज कुंद्राच्या खासगी आयुष्याबद्दलची चर्चा रंगत आहेत. पुन्हा एकदा राज कुंद्राची पहिली पत्नी चर्चेत आली आहे. 

राज कुंद्राची पहिली पत्नी कविताही लंडनमधल्या बिझनेसमनची मुलगी आहे. राज कुंद्रापासून कविताला एक मुलगीही आहे. शिल्पाच्या वाढत्या जवळीकमुळे राज कुंद्राने कविताला घटस्फोट दिल्याचा आरोप तिने केला होता. पत्नी कविता गरोदर असतानाच राज कुंद्राचे शिल्पासह जवळीक वाढली होती. राज कुंद्राने कविताकडे दुर्लक्ष केले होते. याच कारणामुळे २००६मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

शिल्पा आणि राज कुंद्राच्या लग्नानंतर कविताने सांगितले होते की, शिल्पानेच त्यांचा संसार मोडला आहे. शिल्पा नसती तर कवितासह राज कुंद्राचा सुखाने संसार सुुरु असता. राज कुंद्राचे शिल्पासह अफेअर सुरु झाले तेव्हा राज लंडनमध्येच राहत होता. शिल्पाला भारतातच राहायचे होते.  इंडस्ट्रीमध्ये शिल्पाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. सगळं सोडून शिल्पा लंडनमध्ये राहण्यास तयार नव्हती. शिल्पासह लग्न करण्यासाठी राज कुंद्रालाच भारतात यावे लागले आणि तो इथेच स्थायिक झाला.

शिल्पाला इंम्प्रेस करण्यासाठी लग्नाआधीच राजने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरच आलिशान बंगला खरेदी केला होता. राज कुंद्राने जेव्हा हे सरप्राईज शिल्पाला दिले तेव्हा तिनेही आनंदाच्या भरात फार काही विचार न करता लग्नासाठी होकार दिला होता. २००९मध्ये दोघांनी लग्न केले. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raj Kundra's ex wife is also a successful business women, then why He left her and chose Shilpa Shetty, know here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app