Raj kummar rao opens up about priyanka chopra and said she never made us feel that she was the biggest star on our set | ‘द व्हाईट टायगर’च्या सेटवर प्रियंका चोप्राची अशी होती वर्तणूक, खुद्द राजकुमार रावने केला खुलासा

‘द व्हाईट टायगर’च्या सेटवर प्रियंका चोप्राची अशी होती वर्तणूक, खुद्द राजकुमार रावने केला खुलासा

राजकुमार राव आजकाल 'बधाई दो' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच प्रियंका चोप्रासोबत तो 'द व्हाईट टायगर' सिनेमात दिसणार आहे. प्रियंका चोप्रासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि सेटवर ती तिच्या सहकलाकारांशी कशी वागते याबद्दल राजकुमार रावने खुलासा केला आहे.

 ETIMES बोलताना राजकुमार रावने प्रियंका चोप्राच्या स्तुती केली आहे. प्रियंका चोप्राविषयी बोलताना राजकुमार राव म्हणाले की, "ती खूप मस्त आहे आणि एक ती ग्लोबल स्टार असल्याचे सेटवर कोणालाच भासू देत नाही. 


'प्रियंका चोप्राने सीन्ससाठी मदत केली'
तो म्हणाला, 'मी नेहमीच त्याच्या कामाचा एक मोठा चाहता आहे. मोठ्या कलाकारांसोबत काम करण्यास मजा येते कारण यामुळे तुमचा परफॉर्मेन्स जास्त चांगला होता. प्रियंकानेही माझ्या बाबतीत असेच काही केले. तिने माझ्या सीन्ससाठी मला मदत केली. मी त्याच्याबरोबर आणखी काम करण्यास उत्सुक आहे. 

‘द व्हाईट टायगर’मध्ये प्रियंकाने यात पिंकी नामक व्यक्तिरेखा साकारते आहे तर राजकुमारने अशोक नावाचे पात्र जिवंत केले आहे. आदर्श गौरव बलराम नामक ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. ड्रायव्हर बलरामला श्रीमंत व्हायचे असते. आधी तो यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मात्र एका वळणावर लवकरात लवकर पैसा कमवण्याच्या नादात तो चुकीच्या मागार्ला लागतो आणि या चित्रपटाची संपूर्ण कथा वेगळ्या वळणावर जाते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raj kummar rao opens up about priyanka chopra and said she never made us feel that she was the biggest star on our set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.