rahul vaidya praises shahrukh khan son aryan upbringing narrates an incident in viral video |  शाहरूखचा मुलगा आर्यन खानच्या प्रेमात पडला ‘बिग बॉस 14’ फेम राहुल वैद्य, खास आहे कारण

 शाहरूखचा मुलगा आर्यन खानच्या प्रेमात पडला ‘बिग बॉस 14’ फेम राहुल वैद्य, खास आहे कारण

ठळक मुद्देराहुलचे बालपण मुंबईमध्ये गेले. येथेच त्याने सुरेश वाडकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहान असतानाच त्याने विविध संगीतस्पर्धांमध्ये भाग घेतला.

‘बिग बॉस 14’चा रनरअप राहुल वैद्य सध्या शाहरूख खान व गौरी खानचा मुलगा आर्यन खानचे कौतुक करताना थकत नाहीये. अलीकडे राहुल वैद्य मुंबईच्या सेंट रेजिसस्थित एका लाऊंजमध्ये गेला होता. येथे त्याला आर्यन खान दिसला. केवळ दिसला नाही तर आर्यनचे एक वेगळेच रूप त्याने पाहिले आणि तो आर्यनच्या अक्षरश: प्रेमात पडला. आर्यनला पाहून राहुल असा काही प्रभावित झाला की, त्याने व्हिडीओ शेअर केला.

व्हिडीओत राहुल म्हणतो, ‘मी एका लाऊंजमध्ये गेलो होतो. नाव लूना. शनिवारची रात्र असल्याने खूप गर्दी होती. पहाटेचे दीड वा दोन वाजता मी वॉशरूममध्ये गेलो. यादरम्यान माझ्या एका मित्राने मला बोलावले आणि आपल्या एका मित्राची ओळख करून दिली. मी एका खूपच आकर्षक व गुड लूकिंग तरूणाला भेटलो. तो दुसरा कुणी नाही तर आर्यन खान होता. सिक्युरिटी गार्ड्स त्याला लाऊंजमध्ये प्रवेश देत नव्हते. साहजिकच सुरक्षा कारणांमुळे सिक्युरिटी गार्ड यांनी मनाई केली. पण आर्यन खान अतिशय संयमपूर्वक तिथे उभा होता. सुपरस्टाशाहरूख खानचा मुलगा असल्याचा कोणताही अ‍ॅटीट्यूड त्याच्या चेह-यावर नव्हता. मी यासाठी शाहरूख व गौरी खान यांचे खास अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी आर्यनला इतके चांगले संस्कार दिलेत. ना अहंकार, ना  मोठेपणा. आर्यन खूप चांगला आहे, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. तुला भेटून खूप आनंद वाटला... ’
राहुल वैद्यचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

राहुलचे बालपण मुंबईमध्ये गेले. येथेच त्याने सुरेश वाडकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहान असतानाच त्याने विविध संगीतस्पर्धांमध्ये भाग घेतला. मिठीबाई महाविद्यालयात बारावीत शिकत असताना त्याने इंडिअन आयडल या स्पर्धेत भाग घेतला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rahul vaidya praises shahrukh khan son aryan upbringing narrates an incident in viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.