रागिनी एमएमएस वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री करिश्मा शर्माने नुकतेच ब्लॅक मिनी ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो बँकॉक व्हॅकेशनमधील आहेत. या फोटोमध्ये करिश्मा ग्लॅमरससोबत बोल्डदेखील दिसते आहे. 

ब्लॅक मिनी ड्रेसमधील करिश्माचे हे सिजलिंग फोटो कोणत्या छान ठिकाणचे नाही तर बाथरूममधील आहेत. टॉयलेट सीटवर उभी राहून आणि वॉश बेसीनजवळ करिश्माने ग्लॅमरस पोझ दिले आहेत.


करिश्मा हिने फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, मुलींच्या वॉशरूममध्ये रागिनी एमएमएस अभिनेत्रीचा किलर अंदाज, शेअर केलेल्या फोटोमध्ये कशापद्धतीने चिल करू शकते हादेखील एक किलर अंदाज आहे. याशिवाय तिने स्वतःच्या ओठांची, स्माईल आणि बऱ्याच गोष्टींचं कौतूक केलं आहे. आपल्या गर्ल गँगसोबत पोज देत करिश्मा शर्मा.


करिश्मा शर्मा सध्या बँकॉकमध्ये सुट्ट्या व्यतित करत आहे.


करिश्माने २०१७ साली ऑल्ट बालाजीच्या रागिनी एमएमएस रिटर्न्समध्ये काम केलं आहे. या सीरिजमध्ये ती खूप बोल्ड दिसली होती. 
करिश्मा सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिने तिच्या बिकनी फोटोमधून बऱ्याचदा लोकांचे अटेंशन मिळवले  आहे. 


करिश्मा शर्माने प्यार का पंचनामा 2, होटल मिलान, फंसते फंसाते, सुपर 30 और उजड़ा चमन या चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय पवित्र रिश्ता, ये है मोहब्बतें, लव बाय चांस, आहट, सिलसिला प्यार का, कॉमेडी सर्कसमध्येदेखील ती झळकली आहे. 

Web Title: The Ragini MMS actress did a photoshoot in the toilet, see her photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.