ठळक मुद्देरघुबीरचे अभिनेत्री नंदिता दाससोबत अफेअर होते. नंदिताला त्याने आपल्या पालकांना देखील भेटवले होते. माझ्याशी घटस्फोट घेऊन त्याला नंदिताशी लग्न करायचे होते असा दावा रघुबीरच्या पत्नीने केला आहे.

रघुबीर यादवने लगान, असोका, डरना मना है, पीपली लाईव्ह, पिकू, न्यूटन, रोमिओ अकबर वॉल्टर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रघुबीरच्या अभिनयाची नेहमीच चर्चा केली जाते. पण आता रघुबीर त्याच्या व्यवसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे.

घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर आता रघुबीरच्या पत्नीने एक खळबळजनक खुलासा केला आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले आहे की, रघुबीर गेल्या अनेक वर्षांपासून संजय मिश्राची पूर्वपत्नी रोशनी अर्चेजासोबत लीव्ह इन मध्ये राहात आहे आणि त्यानेच ही गोष्ट न्यायालयात देखील कबूल केली आहे. त्यांना 14 वर्षांचा मुलगा देखील आहे. आमच्या लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांचे अफेअर सुरू झाले होते. तसेच राज बरोत यांच्या मालिकेत रघुबीर काम करत असताना त्याच्या आयुष्यात आणखी एक महिला आली होती असे त्याने मला त्यावेळी सांगितले होते. या मालिकेच्यावेळी त्याचे अभिनेत्री नंदिता दाससोबत अफेअर होते. नंदिताला त्याने आपल्या पालकांना देखील भेटवले होते. माझ्याशी घटस्फोट घेऊन त्याला नंदिताशी लग्न करायचे होते. पण नंदिता दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडल्याने तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. रघुबीरसोबत लग्न करून तुझ्या आयुष्यात काहीही चांगले होणार नाही असा सल्ला तिला अनेकांनी दिला होता. 

रोशनी आणि रघुबीरच्या नात्याला कशाप्रकारे सुरुवात झाली हे विचारले असता तिने स्पॉटबॉयच्या मुलाखतीत सांगितले की, रघुबीर आणि संजय मिश्रा एकाच इमारतीत राहात होते. रघुबीर आणि संजयच्या पत्नीची चांगली मैत्री होती. एका दिवशी ती रघुबीरच्या मुलाची आई होणार असल्याचे तिला कळले आणि तिने संजयकडून घटस्फोट घेतला.

रघुबीरच्या लग्नाला 32 वर्षं झाली आहे. त्याच्या पत्नीने घटस्फोटाची याचिका दाखल केली असून त्याच्याकडे 10 कोटी रुपयाची पोटगी मागितली आहे. त्यांना 30 वर्षांचा मुलगा असून मुलगा त्याच्या पत्नीसोबतच राहातो. 1988 मध्ये पोर्णिमा आणि रघुबीर यांचे लग्न झाले होते. त्यांनी लव्ह मॅरेज केले होते. त्या दोघांची ओळख नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये झाली होती. सहा महिन्यांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पोर्णिमा त्यावेळी प्रसिद्ध कथ्थक नर्तिका होती तर रघुबीर हा स्ट्रगलिंग अभिनेता होता. पोर्णिमाने रघुबीरसाठी तिचे करियर सोडले. पण रघुबीरला प्रसिद्धी मिळाल्यानंतर तो तिला आणि मुलाला विसरला असे तिचे म्हणणे आहे. 

Web Title: Raghubir Yadav Had An Affair With Nandita Das, Claims Estranged Wife Purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.