ठळक मुद्देराधिका आपटे आणि आदिल हुसैन यांच्यावर पार्च्ड या चित्रपटात चित्रीत करण्यात आलेला एक बोल्ड सीन ऑनलाईन लीक झाला होता. या चित्रपटातील हे दृश्य लीक झाल्याचा सगळ्यांनाच शॉक बसला होता.

राधिका आपटे एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आजवर तिच्या अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. पण तिचे चित्रपट अथवा शॉर्टफिल्म प्रदर्शित व्हायच्या आधीच यातील बोल्ड दृश्य अनेकवेळा लीक झालेली पाहायला मिळाली आहेत. 

राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांच्यावर पार्च्ड या चित्रपटात चित्रीत करण्यात आलेला एक बोल्ड सीन ऑनलाईन लीक झाला होता. या चित्रपटातील हे दृश्य लीक झाल्याचा सगळ्यांनाच शॉक बसला होता. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधी काही फेस्टिव्हलमध्ये त्याचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. परदेशातून ही दृश्य सोशल मीडियावर लीक झाली असावीत असा अंदाज या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यावेळी लावला होता. 

द वेडिंग गेस्ट या चित्रपटात राधिकाने देव पटेलसोबत एक सेक्स सीन दिला होता. यातील काही दृश्य ऑनलाइक लीक झाली होती. त्यावेळी राधिकाला या गोष्टीचा प्रचंड राग आला होता. तिने मीडियाशी बोलताना सांगितले होते. द वेडिंग गेस्ट या चित्रपटात अनेक खूप चांगली दृश्य असून लोकांच्या केवळ वाईट मनोवृत्तीमुळे केवळ हीच दृश्य ऑनलाईन लीक झाली आहेत. या दृश्यात देव आणि मी दोघेही असलो तरी राधिकाची दृश्य लीक झाली असेच सगळीकडे बोलले जात आहे. 

बोल्ड दृश्यांविषयी बोलताना राधिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी जगभरातील सिनेमा पाहिला आहे. लोक चित्रपटात अथवा स्टेजवर नग्न अवस्थेत अभिनय करताना देखील मी पाहिले असल्याने मला अशाप्रकारचे दृश्य देणे काहीही चुकीचे वाटत नाही. 

राधिका आपटेने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. राधिका तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामध्ये ताळमेळ घालण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तिचे लग्न झाले असून तिचा नवरा परदेशात असतो. राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Radhika Apte's leaked nude scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.