आजपर्यंत आपण बॉलिवूड सेलिब्रेटींच्या महागड्या ब्युटी पार्लरला जाणं, महागडी सौंदर्य प्रसाधनं वापरणं, महागडे कपडे, महागड्या साड्या, महागडे बूट  विषयीच्या बातम्या वाचतो. मात्र एक अभिनेत्री आहे जी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी करते दिवसाला हजारोंचा खर्च . ती अभिनेत्री आहे राधिका आपटे. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी ती दिवसाला 4000 रूपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करते. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी ती खूप पाणी पिते. मात्र ती पित असलेले पाणी हे साधारण नसून बेरोका वॉटरच घेणे ती पसंत करते. 'बेरोका'शिवाय ती दुसरे कोणतेच पाणी पित नाही.  बेरोका विटामिन टेबलेट्स आहेत ज्याची किंमतच 4000 रू. घरात आहे.  अशा प्रकारे महिन्याला 1 लाख 20 हजार रू ती पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करते. बेरोका एक मल्टीनेशनल कंपनी आहे. या कंपनी अंतर्गत विटामिन सी, विटामिन बी टेबलेट्स  बनवले जातात. हे टॅबलेट्स   ऑरेंज, बैरी आणि मैंगो-ऑरेंज फ्लेवरमध्ये उपलब्ध आहेत. 

अभिनयाबरोबरच  व्यायाम, फिटनेस हा कलाकारांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. नियमितपणे व्यायाम करून आपल्या फिटनेसची काळजी घेणे गरजेचे आहे.  राधिका त्यामुळे नित्यनियमाने वर्कआऊट, योगा करते. तसेच  डाएट फॉलो करते. तेलापासून बनलेले पदार्थ अजिबात खात नाही. राधिकाने  उत्तम फिगर मेंटेन केली आहे. तिच्या या फिटनेसचे एक हेच रहस्य तिने पहिल्यांदाच सांगितले आहे. राधिकाही इतरांप्रमाणे फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे.

राधिका आपटे सांगते, ' तिचा स्ट्रगलचा काळ डिप्रेशनचा होता. मला एक चांगला सिनेमा मिळाला होता. पण मला त्या सिनेमातून काढून टाकलं कारण माझं वजन 4 किलो वाढलं होतं. मी त्यांना सांगितलंही मी वजन कमी करेन. पण त्यांनी ऐकलं नाही. ही बातमी आली तेव्हा मी बरिस्तामध्ये मित्रमैत्रिणींसोबत होते. केक मागवला होता. पण मी तो केक खाऊच शकले नाही. आता चित्र पालटले आहे. दिवसेंदिवस बदल होत आहेत. त्यामुळे कलाकारांनाही त्यांच्या भूमिकेनुसार बदल करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. योग्य ती ट्रेनिंग दिली जाते. तुर्तास सोशल मीडियावर नजर टाकल्यास फिट आणि तंदुरुस्त राधिका आपटेचा अंदाज पाहून तुम्हीही फिदा झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.

Web Title: Radhika Apte spent lakhs of rupees monthly on drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.