सध्या नो मेकअप सेल्फीचा ट्रेंड असून बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्री विनामेकअप फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता अभिनेत्री राधिका आपटे हिने देखील इंस्टाग्रामवर विनामेकअप फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती फारच वेगळी दिसते आहे. त्यात तिचे केसही विस्कटलेले दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.


राधिका आपटे हिने इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करत म्हटलं की, बरेच दिवस मेकअप व हेअरस्टाईल केल्यानंतर शेवटी आले मी माझ्या मूळ रुपात. चांगले धावल्यानंतर माझे केस माझ्या अवतीभवती उडू लागले आहेत.


राधिका सोशल मीडियावर सक्रीय असते आणि ती तिचे फोटो व आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा ग्लॅमरस व हॉट अंदाजात दिसणाऱ्या राधिकाला नो मेकअप लूकमध्ये पाहून चाहते चकीत झाले आहेत. 


राधिका आपटेच्या आधीही अनेक अभिनेत्रींनी आपला नो-मेकअप सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये करीना कपूर,सोनम कपूर, स्वरा भास्कर, मलायका अरोरा, कृति सेनन यांसारख्या बॉलिवूडच्या अग्रगण्य अभिनेत्रींचाही समावेश होता. त्यामुळे सध्या नो-मेकअप सेल्फी सध्या ट्रेन्डिगमध्ये आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.


राधिका आपटेने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. राधिका तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामध्ये ताळमेळ घालण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तिचे लग्न झाले असून तिचा नवरा परदेशात असतो. राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

Web Title: Radhika Apte shared without makeup photo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.