Radhika Apte is seen sitting on the streets of London TJL | लंडनच्या रस्त्यावर बसलेली दिसली राधिका आपटे, चाहते विचारताहेत कोथिंबीर आणि कलिंगडचा भाव

लंडनच्या रस्त्यावर बसलेली दिसली राधिका आपटे, चाहते विचारताहेत कोथिंबीर आणि कलिंगडचा भाव

बॉलिवूडची अभिनेत्री राधिका आपटे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सगळेचजण आपापल्या घरी आहेत. लॉकडाउनमुळे शूटिंगलाही रजा असल्यामुळे राधिका आपटेलंडनमध्ये आहे. तिथे तिचा नवरा राहतो. नुकताच तिने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

राधिकाने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती लंडनच्या रस्त्यावर बसलेली दिसते आहे. या फोटोत तिच्यासोबत कापलेल्या कलिंगडचा तुकडा आणि पिशवीतून बाहेर डोकावणारी कोथिंबीर पहायला मिळतेय. 

तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिच्या काही चाहत्यांनी तिला 5 रुपयांची कोथिंबीर द्या आणि कलिंगड कितीला देणार असे विचारले आहे. तिने हा फोटो असा नेमका का काढला, हे समजलेले नाही.

काही दिवसांपूर्वी राधिकाने हेअर शॉर्ट केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या या फोटोलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. 

 

 

Web Title: Radhika Apte is seen sitting on the streets of London TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.