ठळक मुद्देमाझी आजी माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती असल्याने मला तिचीच साडी लग्नात घालायची होती आणि तसेही मला कपड्यांवर उगाचच वायफळ खर्च करायला आवडत नाही.

राधिका आपटेने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. राधिका तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामध्ये ताळमेळ घालण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तिचे लग्न झाले असून तिचा नवरा परदेशात असतो. राधिकाच्या नवऱ्याचं नाव बेनेडिक्ट टेलर असून तो लंडनमध्ये स्थायिक आहे. तो एक संगीतकार असून त्या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. राधिकाला शूटिंगमधून जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा ती लंडनला जाते. राधिका नेहमीच तिच्या खाजगी आयुष्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये न बोलणेच पसंत करते. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने तिच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गुपितं सांगितली आहेत.

राधिकाने तिच्या लग्नात काय घातले होते याविषयी या मुलाखतीत सांगितले असून याच गोष्टीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. राधिकाने या मुलाखतीत सांगितले आहे की, मी माझ्या लग्नात माझ्या आजीची जुनी साडी घातली होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही साडी चांगलीच विरली होती आणि या साडीला काही छिद्रं देखील होती. पण माझी आजी माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती असल्याने मला तिचीच साडी लग्नात घालायची होती आणि तसेही मला कपड्यांवर उगाचच वायफळ खर्च करायला आवडत नाही. मी रजिस्टर्ड मॅरेज करणार असल्याने त्यासाठी अतिशय महागडे कपडे घ्यावेत हे मला पटत नव्हते. 

राधिकाने पुढे या मुलाखतीत सांगितले की, इतर मुलींसारखे मला देखील लग्नात छान दिसायचे होते. त्यामुळे लग्नानंतर जवळच्या मित्रमैत्रिणांसाठी दिलेल्या पार्टीत घालण्यासाठी मी एक ड्रेस घेतला होता. या ड्रेसची किंमत 10 हजारापेक्षा देखील कमी होती. हा ड्रेस देखील घ्यायला मी विसरले होते. मी शेवटच्या क्षणी जाऊन शॉपिंग केली होती. मला शॉपिंग करायला जास्त वेळ लागत नसल्याने माझे हे काम पटकन झाले होते. 

राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Radhika Apte opted for her grandmother's sari and a dress worth Rs 10,000 for her wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.