ठळक मुद्देहा दाक्षिणात्य सुपरस्टार दुसरा कोणीही नसून आर. माधवन आहे. आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटाने कोट्यवधी चाहत्यांना वेड लावले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील खूप चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीची ऑन स्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली होती. या गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. 

बंटी और बबली या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी ही जुनी जोडी झळकणार की या चित्रपटात कोणत्या नव्या कलाकारांची वर्णी लावणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये अभिषेक बच्चनने काम करण्यास नकार दिला असून त्याच्या ऐवजी एका दाक्षिणात्य सुपरस्टारची या चित्रपटात वर्णी लागली आहे. हा दाक्षिणात्य सुपरस्टार दुसरा कोणीही नसून आर. माधवन आहे. आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

बंटी और बबली य चित्रपटात गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून शरवरी वाघ ही अभिनेत्री या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण वी शर्मा करणार असून त्याने याआधी अली अब्बास जाफरला टायगर जिंदा है या चित्रपटासाठी असिस्ट केले आहे.

बंटी और बबली या प्रसिद्ध चित्रपटात अभिषेकचे वडील म्हणेजच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. शिवाय अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन ही सुद्धा चित्रपटातील एका गाण्यात झळकली होती. अभिषेक, अमिताभ आणि ऐश्वर्या यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले कजरारे... हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: R Madhavan to replace Abhishek Bachchan in ‘Bunty Aur Babli’ sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.