Priyanka Chopra's green ball dress inspires memes | प्रियंका चोप्राचा बलून ड्रेस पाहून हसू आवरणार नाही, मीम्स पहाल तर हसून हसून वेडे व्हाल!!

प्रियंका चोप्राचा बलून ड्रेस पाहून हसू आवरणार नाही, मीम्स पहाल तर हसून हसून वेडे व्हाल!!

ठळक मुद्देबॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपली ओळख निर्माण केली आहे.

अ‍ॅक्टिंग, फॅशनच्या बाबतीत प्रियंका चोप्राला तोड नाहीच. पण अनेकदा चित्रविचित्र फॅशन व ड्रेसमुळे ती ट्रोल होते. अलीकडे प्रियंकाने एक युनिक ड्रेस कॅरी केला आणि काय तर सोशल मीडियावर ‘मीम्ससेना’ लगेच अ‍ॅक्टिव्ह झाली. प्रियंकाच्या या ड्रेसवर इतके मीम्स आणि जोक्स बनलेत की ते वाचून खुद्द प्रियंकालाही हसू आवरेनासे झाले. तिने स्वत:ही काही मजेदार मीम्स सोशल मीडियावर शेअर करत, मीम्ससेनेचे आभार मानलेत.
आज एक ट्विट करत तिने स्वत:वरचे एक भन्नाट मीम शेअर केले. खूपच मजेदार आहे. माझा दिवस बनवण्यासाठी आभार मित्रांनो, असे हे मीम्स शेअर करत तिने लिहिले. तिचे हे ट्विट क्षणात व्हायरल झाले. मग काय, सोशल मीडियावर तिच्या या ड्रेसवरचे असंख्य मीम्स व्हायरल झालेत. कुणी प्रियंकाच्या ड्रेसला सुतळी बॉम्ब म्हटले तर कुणी हॉट एअर बलून. कुणी तिची तुलना लॉलीपॉपसोबत केली तर कुणी पोकेमॉनसोबत.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपली ओळख निर्माण केली आहे. प्रियंका चोप्राने गेल्या काही वर्षांमध्ये मोनोक्रोमैटिक्स आउटफिट्स, सेक्सी ड्रेसेस, पेन्सिल गाउन्स आणि हाय स्लिट्समधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र ब-याचदा स्टायलिश दिसण्याच्या नादात प्रियंकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. असेच काहीसे मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टमध्ये पार पडलेल्या मेट गाला २०१९च्या इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राची अतरंगी स्टाईल पाहून लोक हैराण झाले होते. जसा प्रियंकाचा या ड्रेसमधील फोटो समोर आला तसा लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती.कुणी तिला चुडैल म्हटले होते तर कुणी भूत.  एका युजरने तर तिच्या केसांची तुलना वीरप्पनच्या मिशीसोबत केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Chopra's green ball dress inspires memes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.