ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड व हॉलिवूडचे प्रसिद्ध कपल प्रियंका चोप्रानिक जोनास सहभागी झाले होते. दोघांना रेड कार्पेटवर पाहून सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच खिळून राहिल्या होत्या. त्या दोघांनी ग्लॅमरस अंदाजात एन्ट्री मारली आहे. शोमध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती प्रियंका चोप्राच्या स्टायलिश गाऊनची. या सोहळ्यासाठी तिने परिधान केलेला ड्रेस पाहून चाहते हैराण झाले आहेत. त्यांचे फोटो पाहून एकीकडे कौतूक केलं जात आहे तर दुसरीकडे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो आहे.

खरेतर प्रियंकाने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा नवरा निक जोनाससोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ग्रॅमीज २०२०.

फोटोमध्ये प्रियंकाने ऑफ व्हाईट गाऊन परिधान केला आहे. हा गाऊन डीप फ्रंट ओपन गाऊन आहे. तिचा गाऊनचा गळा मानेपासून पोटाच्या बेंबीपर्यंत ओपन आहे. या गाऊनमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.

एकीकडे लोक तिच्या स्टाईलची प्रशंसा करत आहेत तर काही सोशल मीडियावर युजर्स तिच्या ड्रेसला घेऊन टीका करत आहेत.

सोशल मीडिया युजर्स प्रियंकाचा ड्रेस पाहून चित्रविचित्र म्हणत डेंजर, वाईट आणि घाणेरडा ड्रेस अशी कमेंट केली. एका युजरने लिहिले की, निराशाजनक यापेक्षा तर चांगले होते बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली तेव्हा प्रियंका चोप्रा चांगली कपडे परिधान करत होती. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, लग्नानंतर असंच होतं. तर आणखीन एका युजरने लिहिले की, ड्रेस चांगला आहे पण तू खूप डेंजर वाटतेय.
 

Web Title: Priyanka Chopra's dress up at the Grammy Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.