आतापर्यंत आपण सेलिब्रेटींना सोशल मीडियावर फेमस होताना पाहिले आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का अशी एक अभिनेत्री आहे तिच्यासोबतच तिचा डॉगी देखील तिच्या इतकाच फेमस आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे. पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्रा. प्रियंकाने पाळलेला डॉगीचा थाट  हा कोण्या मोठ्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. चक्क सोशल मीडियावर त्याच्या नावाचे अकाउंटही बनवण्यात आले आहे. या डॉगीच्या अकाउंटला देखील चांगले फॉलोअर्स आहेत. आणि सगळ्यात हटके म्हणजे प्रियंका आणि पती निक जोनासने या डॉगीला आपले सरनेम देखील लावले आहेत. लग्नानंतर प्रियंका कडे आणखीन एका डॉगीची भर पडली. निक जोनासचाही एक डॉगी आहे.

 

प्रियंकाच्या डॉगीचे नाव डियाना चोप्रा तर निकच्या डॉगीचे नाव आहे जियॉन जोनास. या दोघी डॉगींची दिवसाचा खर्च हा एक माणसाच्या दैनंदिन जीवनापेक्षाही अधिक आहे. प्रियंकाप्रमाणेच तिची डॉगी देखील खूप स्टायलिश आहे. वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये प्रियंका प्रमाणेच डॉगी देखील स्टायलिश अंदाजात अवतरते. या दोघां डॉगींचे वॉर्डरोब एका अभिनेत्रींच्या वॉर्डपेक्षाही मोठे आहेत. मोठ्या रेस्टॉरंटमधूनच दोघांसाठी जेवण येते. देसी गर्लच्या या हटके डॉगी प्रेमाने तिचे सारेच चाहते भारावलेत. मग काय इतके थाट असणाऱ्या डॉगीची चर्चा तर होणारच, नाही का?


विशेष म्हणजे प्रियंका चोप्रा फक्त देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय सेलेब्सच्या यादीत पिग्गी चॉप्सचा देखील समावेश आहे. इंस्टाग्रामवरील तिचे पोस्ट व फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होता. मात्र प्रियंकासाठी सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म फक्त चाहते व फॉलोअर्सशी संवाद साधण्याचं माध्यम नाही. तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कोटींची कमाई करते. प्रियंकाने ब्रँडेड कंपन्यांसोबत करार करत असून, त्यांचे ब्रॅंड्स आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटंवरून प्रमोट करताना दिसते आहे. यातून तिला खूप पैसे मिळतात.

त्याचबरोबर हॉपर एचक्यू (HopperHQ)ने प्रसिद्ध केलेल्या टूलमधील लिस्टनुसार तिला पोस्ट करण्याचेही कोट्यवधी रूपये मिळतात.
लिस्टनुसार तिचे ४ कोटी ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, तिला प्रत्येक पोस्टसाठी २ लाख ७१ हजार डॉलर म्हणजेच १ कोटी ८६ लाख ९८ हजार रूपये मिळतात. ही खरंच खूप मोठी रक्कम असून, ब्रँडेड कंपन्यांकडून झालेल्या करारातूनही ती आणखी पैसे मिळवते. ही रक्कम देखील कोट्यवधीमध्ये असते.

Web Title: Priyanka Chopra's Doggie diana Also Famous On Social Media,Read The Detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.