प्रियंका चोप्राचे 'अनफिनिश्ड' पुस्तक येणार हिंदीत?, अभिनेत्रीने दिली ही हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 11:38 AM2021-03-06T11:38:09+5:302021-03-06T11:38:55+5:30

प्रियांका चोप्राने या बायोग्राफीमध्ये आपल्या जीवनाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत.

Priyanka Chopra's book 'Unfinished' will come in Hindi ?, this hint given by the actress | प्रियंका चोप्राचे 'अनफिनिश्ड' पुस्तक येणार हिंदीत?, अभिनेत्रीने दिली ही हिंट

प्रियंका चोप्राचे 'अनफिनिश्ड' पुस्तक येणार हिंदीत?, अभिनेत्रीने दिली ही हिंट

googlenewsNext

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता केवळ अभिनेत्री, निर्माती राहलेली नाही. लेखिका ही तिची नवी ओळख आहे. नुकतेच तिचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रियंकाचे हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आले आहे. या पुस्तकात प्रियंकाने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.  हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांमध्येच ते न्यूयॉर्क टाइम्सच्या यादीत 'बेस्ट सेलर' म्हणून जाहीर करण्यात आले. 

प्रियांका चोप्राने या बायोग्राफीमध्ये आपल्या जीवनाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत. तसेच अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे, ज्याबाबत माहिती करून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामुळेच प्रियांकाच्या या पुस्तकाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यातच आता या पुस्तकाची हिंदी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याने बॉलिवूडमधील चाहत्यांनाही ते उपलब्ध होणार आहे.


याबाबत एक पोस्ट करत अभिनेत्रीने संकेत दिले आहेत. प्रियांका चोप्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती एका कागदावर हिंदी भाषेत लिहिताना दिसत आहे. परंतु ही क्‍लिप शेअर करत तिने कोणताही उल्लेख केलेला नाही. परंतु ती 'अनफिनिश्‍ड'च्या हिंदी आवृत्तीकडे इशारा करत असल्याचे प्रतित होते.


प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती हल्लीच तिचा द व्हाइट टायगर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि आदर्श गौरव मुख्य भूमिकेत होते. लवकरच ती टेस्ट फॉर यू चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग तिने नुकतेच लंडनमध्ये पूर्ण केले आहे. 

Web Title: Priyanka Chopra's book 'Unfinished' will come in Hindi ?, this hint given by the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.