priyanka chopra trolled for high heels and transparent dress on basketball court | हे भगवान, क्या क्या पहनती है ये लडकी...! पुन्हा एकदा ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका चोप्रा

हे भगवान, क्या क्या पहनती है ये लडकी...! पुन्हा एकदा ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका चोप्रा

ठळक मुद्देप्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतीच ती राजकुमार रावसोबतच ‘द व्हाईट टायगर’मध्ये दिसली. आता तिच्याकडे हॉलिवूडचे दोन सिनेमे आहेत.

बॉलिवूडपासून  हॉलिवूडपर्यंत करोडो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते.  सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्टचीही चर्चा होतेच. आता काय तर इन्स्टावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे प्रियंका ट्रोल होतेय.
या फोटोत प्रियंका बास्केट बॉल कोर्टवर उभी आहे आणि हाताच्या एका बोटावर तिने बॉल बॅलेन्स केला आहे. पण प्रियंकाने या फोटोत बिकिनी घातली आहे आणि त्यावर ट्रान्सपरन्ट कोट आहे. नेमक्या या कपड्यांमुळेच प्रियंका ट्रोल होतेय. 

अशा ड्रेस घालून कोण खेळतं? हा ड्रेस घालून तू बास्केट बॉल खेळणार? असा प्रश्न काही युजर्सनी तिला केला. काहींनी तर तिला ‘भूतनी’ म्हणूनही डिवचले. अर्थात असंख्य युजर्सनी पीसीच्या या फोटोचे कौतुकही केले.

15 तासांत या फोटोला 14.5 लाख लाईक्स आलेत, यावरून अनेकांना हा फोटो आवडला. एकंदर काय तर मूठभर लोकांनी ट्रोल केले असले तरी प्रियंकांच्या लाखो फॅन्सला पीसीचा हा अंदाज भलताच आवडला.

अभिनेता हृतिक रोशन व आयुष्यमान खुराणा यांनीही प्रियंकाच्या या फोटोवर कमेंट केली आहे. ‘हा हा नाईस,’ असे या फोटोवर कमेंट करताना हृतिकने लिहिले. आयुष्यमान खुराणा व सोनाली बेंद्रे यांनी यावर फायर इमोजी पोस्ट केला.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतीच ती राजकुमार रावसोबतच ‘द व्हाईट टायगर’मध्ये दिसली. आता तिच्याकडे हॉलिवूडचे दोन सिनेमे आहेत. लवकरच ती सॅम ह्यूएन आणि सेलिन डायॉनसोबत ‘टेक्स्ट फॉर यू’आणि कियानू रीव्ससोबत ‘मॅट्रिक्स 4’ या सिनेमात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: priyanka chopra trolled for high heels and transparent dress on basketball court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.