ठळक मुद्दे२००२ मध्ये असीमच्या आईचे निधन झाले. असीमच्या आईवर प्रियंकाचे खूपच प्रेम होते. त्यामुळे त्याच्या आईच्या निधनानंतर प्रियंकाला हे दुःख सहन होत नव्हते आणि तिने तिच्या घराच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री असून तिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने आजवर बर्फी, डॉन, बाजीराव मस्तानी, फॅशन, मेरी कोम, कमीने यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला आजवर तिच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाला असून तिला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. 

प्रियंका चोप्रा ही मिस वर्ल्ड असून आज म्हणजेच १८ जुलैला तिचा ३७ वा वाढदिवस आहे. प्रियंकाने सनी देओलसोबत द हिरोः ऑफ ए स्पाय या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात प्रीती झिंटादेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितका प्रतिसाद मिळाला नसला तरी तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने अंदाज या चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

आज प्रियंकाने एक अभिनेत्री, गायक, निर्माती म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. पण प्रियंकाला देखील तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अपयशाला सामोरे जावे लागले होते. प्रियंकाने एकदा नव्हे तर चक्क तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रियंकाचे पूर्व मॅनेजर प्रकाश जाजू यांनीच ही गोष्ट सगळ्यांना सांगितली होती.

प्रियंका बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. त्याचवेळी ती असीम मर्चंट सोबत नात्यात होती. ते दोघे एकमेकांसोबत खूपच खूश होते. पण २००२ मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. प्रकाश जाजूने २०१६ मध्ये सोशल मीडियाद्वारे प्रियंकाच्या आयुष्यातील या गोष्टीविषयी सांगितले होते. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, २००२ मध्ये असीमच्या आईचे निधन झाले. असीमच्या आईवर प्रियंकाचे खूपच प्रेम होते. त्यामुळे त्याच्या आईच्या निधनानंतर प्रियंकाला हे दुःख सहन होत नव्हते आणि तिने तिच्या घराच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचवेळी मी तिथे पोहोचलो आणि मी तिला वाचवले होते. 

तसेच असीमसोबत भांडण झाल्यानंतरही मुंबईतील वर्सोवा या परिसरात प्रियंका आत्महत्या करायला गेली होती. पण त्यावेळी देखील जाजूने तिला वाचवले होते असा त्याने दावा केला होता. 

Why to hide when she didnt care about me 🙂… Daily pc & aseem main zhagda hota, raat ko 2-2, 3-3 baje rote hue mujhe phone karti & main

— PRAKASH JAJU (@Prakashjaaju) April 2, 2016

 

2 … usko raat ko 2-2 baje aseem ke ghar ke niche se apni car main leke aata, phir usko samjha bujha ke uske ghar chodta.

— PRAKASH JAJU (@Prakashjaaju) April 2, 2016

 

3 … Ek baar madam, aseem se zhagda karke car leke vasai chali gayi suicide karna, badi mushkil se samjha buza ke wapis bulaaya 🙂

— PRAKASH JAJU (@Prakashjaaju) April 2, 2016

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Chopra tried committing suicide during her struggling days, alleges ex-manager Prakash Jaju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.