ठळक मुद्देसोफी टर्नर व जो जोनास 2016 पासून एकमेकांना डेट करत होते.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांचे लग्न होऊन आता जवळपास दीड वर्ष पूर्ण झाले आहे. साहजिक प्रियंका -निक गुड न्यूज कधी देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.  मध्यंतरी प्रियंकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र नंतर त्या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. पण आता लवकरच जोनास कुटुंबीयांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.  जोनास कुटुंब या नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी कमालीचे उत्सुक आहे. हा चिमुकला सदस्य कोण तर प्रियंकाची जाऊबाई आणि जो जोनासची वाईफ सोफी टर्नर हिचे पहिले बाळ. होय, सोफी व जो आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. जो जोनास हा निकचा मोठा भाऊ आहे.

23 वर्षांची सोफी प्रेग्नंट असल्याचे कळतेय. अद्याप जो आणि सोफी यांनी ही गुड न्यूज आॅफिशिअली शेअर केलेली नाही. केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांनाच ही गोड बातमी देण्यात आली आहे. तूर्तास सोफी प्रेग्नंट असल्याची बातमी लपवताना दिसतेय.

सोफी व जो नुकतेच ग्रॅमी अवार्डमध्ये दिसले होते. प्रियंका व तिचा पती निक जोनास हे दोघेही या अवार्ड शोला हजर होते. तुम्हाला आठवत असेलच की, या सोहळ्यात प्रियंकाने डिप नेकलाईन गाऊन घालल्यामुळे ती ट्रोल झाली होती.

सोफी टर्नर व जो जोनास 2016 पासून एकमेकांना डेट करत होते. 2017 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. गतवर्षी मे महिन्यात एका सरप्राईज सेरेमनीत दोघांनी लग्न केले होते. यानंतर जून महिन्यात पॅरिसमध्ये दोघांचे धुमधडाक्याने लग्न झाले होते. जोच्या लग्नाआधी निक जोनास व प्रियंकाचे लग्न झाले होते. सोफी व जो या लग्नाला हजर होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: priyanka chopra sister-in-law sophie turner expecting first child with husband joe jonas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.