लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत आणि सोशल मीडियावर जुने फोटो शेअर करताना दिसत आहे. कित्येक कलाकार घरात कसा वेळ व्यतित करत आहेत, त्याची अपडेट सातत्याने देत आहेत. यादरम्यान प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवर तिचे दोन जुने फोटो शेअर केले आहेत. यात तिने जुना फोटो शेअर करत अपेक्षा म्हटलंय तर दुसरा फोटो टाकून सत्य म्हटलं आहे.

प्रियंकाने शेअर केलेले दोन्ही फोटो तिचेच आहेत तिने अपेक्षा विरूद्ध रिएलिटी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एका फोटोत तिने डस्टी रोज कलरचा मोनोकनी घातलेला दिसत आहे आणि त्यावर कॅट आयचे सनग्लासेस कॅरी केले आहेत. या फोटोत ती खूप बोल्ड व ग्लॅमरस दिसते आहे. तर दुसऱ्या फोटोत ती उन्हात झोपलेली दिसते आहे आणि तिने तिचा चेहरा झाकलेला दिसत आहे. तिने या दोन्ही फोटोंची तुलना केली आहे.काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला वीस लाखाहून जास्त ह्युज मिळाले आहेत. तसेच या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. आता प्रियंका चोप्रा तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेत आहे आणि सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.काही दिवसांपूर्वी प्रियंकाने वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये तिचा फोटो शेअर केला होता. तसेच ती निक जोनाससोबतचेही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

सध्या लॉकडाउनमध्ये ती निकसोबत क्वॉलिटी टाइम व्यतित करत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Chopra shared photo on instagram, said expectation vs reality TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.