कोरोनाचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही. आजही हजारो लोक या विषाणूमुळे बळी पडत आहेत .उपचारादरम्यान अनेकांचा मृत्यूही झाला आहे. व्हायरसची नासधूस पाहून बॉलिवूड सेलेब्सही सामान्य लोकांप्रमाणेच क्वचितच घराबाहेर पडत आहेत. असे बरेच सेलेब्स आहेत जे आपल्या कामावर परतले आहेत आणि चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान सेलेब्सही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. त्यांच्या चाहत्यांसह सेलेब्स सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट शेअर करत असतात.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि पॉप गायक निक जोनास गेल्या वर्षी रेशीमगाठीत अडकले. १ डिसेंबर २०१८ रोजी हिंदू पद्धतीने तर २ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं लग्न झालं. प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या आयुष्यातील आनंददायी क्षणांचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच  तिने  इन्स्टाग्राम एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने  आई मधु चोप्रालाही टॅग केला आहे. हा फोटो शेअर करताना प्रियंकाने आईला 'नानी' आजी म्हटले आहे.  या फोटोत प्रियंकासह तिचा पती निक आहेच. शिवाय या दोघांसह फोटोत डायनाही पाहायला मिळत आहे. 

तिचा हा फोटो पाहून अनुष्का करिना पाठोपाठ आता प्रियंकाही गुड न्युज देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी हा फोटो पाहिल्यावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली की प्रियंका खरोखर प्रेग्नंट आहे का? प्रियंकाने शेअर केलेल्या फोटो तिची पेट डॉगी  दिसत आहे. या डॉगीचे नाव  डायना आहे. प्रियंकाला प्राण्यांची खूप आवड आहे. त्यामुळे डायनाला ती एका आईप्रमाणेच माया देते तिला सांभाळते. तिची काळजी घेते. इतकेच काय तर  डायनाच्या नावाने प्रियंकाने इन्स्टाग्राम अकाउंटही तयार केले आहे. 

बाबो..! म्हणे या गोष्टीशिवाय राहू शकत नाही निक जोनस, प्रियंका चोप्राने शेअर केले बेडरूम सीक्रेट

प्रियंकाच्या सांगण्यानुसार, जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा निकला सर्वात आधी माझा चेहरा पहायचा असतो. त्यानंतर मी त्याला मी सांगते की एक मिनिट थांब, मी जरा मॉश्चरायजर व मस्कारा लावते. झोपेतून उठल्यावर चेहरा थोडा डल वाटतो. पण निकला तोच चेहरा सुपर स्वीट वाटतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Chopra Share Mother Madhu Chopra Photo And Caption It Nani Fans Ask Is Bollywood Actress Pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.