प्रियंका चोप्राचा नुकताच द स्काय इज पिंक हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात प्रियंकाने एका आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामुळे प्रियंका बरेच दिवस चर्चेत होती. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. प्रियंकाने इंस्टाग्रामवर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. 

प्रियंकाने शेअर केलेल्या व्हिडिओत तिची स्टायलिस्ट दिव्या ज्योतीची मुलगी कृष्णा स्काई सर्किसिअनसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसते आहे. कृष्णाला उचलून प्रियंका तिच्याशी क्युट अंदाजात बोलताना दिसत आहे. ते दोघेही एकमेकांना क्यूट सांगत आहेत. प्रियंकाने कृष्णा ला क्यूट म्हटलं तर कृष्णाने प्रियंकाला. हा व्हिडिओ शेअर करत प्रियंकाने म्हटलं की, आम्ही दोघं क्यूट आहोत.


प्रियंकाचा हा व्हिडिओ सर्वांना खूप भावतो आहे आणि या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

प्रियंकाच्या सिनेमाबद्दल बोलायचं तर ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा सत्य कथेवर आधारित आहे. मोटीव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी आणि तिच्या आई-वडीलांच्या संघर्षाची ही कथा दिग्दर्शिका सोनाली बोस यांनी मोठ्या पडद्यावर मांडली आहे.

आयशाला पल्मोनरी फाइब्रोसिस नावाचा आजार असतो. तिचा वयाच्या 18 व्या वर्षी मृत्यू झाला होता. भारतात हा सिनेमा रिलीज होण्याआधी टोरंटो फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये याचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता.


लवकरच प्रियंका राजकुमार रावसोबत पहिला नेटफ्लिक्सवरील चित्रपट द व्हाईट टाइगरचं शूटिंग सुरू करणार आहे.


Web Title: Priyanka Chopra Makes A Splash On Instagram With Niece Krishna: 'We're So Cute'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.