बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर सक्रीय असून ती आपल्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याचदा खुल्लम खुल्ला बोलताना दिसते. नुकतेच तिने एक किस्सा सांगितला. जो ऐकून हैराण व्हायला होते शिवाय हसूदेखील आवरत नाही. प्रियंकाने सांगितलं की एकदा तिला एका माकडाने कानाखाली मारली होती. 


नवभारतने टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रियंकाने आपल्या बालपणीचा किस्सा सांगताना सांगितले की, कदाचित ती तिसऱ्या इयत्तेत होती त्यावेळी ही घटना घडली. तिच्या शाळेजवळ बरीच झाडे होती. एक दिवस तिला एका झाडावर माकडीन दिसली जी स्वतःला खाजवत होती. हे पाहून प्रियंकाला हसू आवरले नाही आणि ती जोराजोरात हसू लागली. 


तिने पुढे म्हटले की, माकडीणीनं तिला हसताना पाहून ती झाडावरून खाली उतरली आणि तिच्याजवळ गेली व प्रियंकाच्या कानशीलात लगावून पुन्हा झाडावर पळून आली. ही घटना आजही प्रियंकाच्या चांगलीच लक्षात आहे.


प्रियंकाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच द स्काई इज पिंक चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रॅप अप पार्टी पार पडली.


बऱ्याच कालावधीपासून प्रियंका बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. आता तिला द स्काई इज पिंक चित्रपटात पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहे.


Web Title: Priyanka Chopra Jonas was once slapped by a monkey!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.