ठळक मुद्देप्रियंका याआधीही अशा बोल्ड ड्रेसमुळे अनेकदा ट्रोल झाली आहे. अर्थात यामुळे तिला जराही फरक पडत नाही.

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत चर्चेत राहणारी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. फॅशन क्वीन, ग्लोबल स्टार म्हणून मिरवणारी नेहमी युनिक अंदाजात दिसते. अनेकींनी बोल्ड ड्रेस घालून मिरवणे कठीण जाते. पण प्रियंका असे रिस्की आऊटफिट्स अगदी सहजपणे कॅरी करते. अर्थात यामुळे अनेकदा ती ट्रोलही होते. 74 व्या ब्रिटीश अ‍ॅकेडमी ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स अर्थात बाफ्टा 2021 च्या (BAFTA 2021) सोहळ्यात प्रियंका अगदी बोल्ड लूकमध्ये दिसली. पण तिचा हा बोल्ड लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले. (Priyanka Chopras glamorous looks at Bafta 2021)

रविवारी संध्याकाळी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये बाफ्टा 2021 च्या सोहळ्याची संध्याकाळ रंगली. या सोहळ्याला प्रियंकाने पती निक जोनाससोबत हजेरी लावली. या सोहळ्यात प्रियंकाला कुठलाही पुरस्कार मिळणार नव्हता. पण प्रेझेंटर म्हणून ती या सोहळ्याला पोहोचली होती.

या खास सोहळ्यासाठी प्रियंकाने दोन ड्रेस निवडले. क्लासिक ब्लॅक फ्लोरलेंथ गाऊन आणि टू पीस सेपरेट्स़ पहिला आऊटफिट तर चाहत्यांना आवडला. पण पीसीचा दुसरा आऊटफिट पाहून युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. प्रियंकाचे जॅकेट पाहून लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करणे सुरु केले. तुम्ही पाहूच शकता की, या जॅकेटच्या वरच्या साईडला बटण आहे.पण खालच्या साईडला एकही बटण नाही. हे जॅकेट फिट बसावे यासाठी डबल साइडेड टेपचा वापर करण्यात आला आहे.

प्रियंकाने हा ड्रेस अतिशय आत्मविश्वासाने कॅरी केला. पण ट्रोलर्सने तरीही तिला ट्रोल केले. आत्तापर्यंतचा सर्वात खराब ड्रेस असे एका युजरने यावर कमेंट करताना लिहिले. तर अन्य एकाने कदाचित डिझाइनर बटण लावणे विसरला, अशा आशयाची कमेंट केली.
प्रियंका याआधीही अशा बोल्ड ड्रेसमुळे अनेकदा ट्रोल झाली आहे. अर्थात यामुळे तिला जराही फरक पडत नाही. बोल्ड फॅशन आणि बोल्ड लूकपुढे प्रियंका ट्रोलिंगचीही पर्वा करत नाही, हेच यावरून दिसते.
प्रियंकाचा हा खास टू पीस सेपरेट्स ड्रेस स्पॅनिशचा फेमस फॅशन डिझाईनर Manuel Pertegaz याने डिझाईन केला होता. यात हँड एम्ब्रॉडरीच्या फ्रंट ओपन जॅकेटसोबत धोती पँटचा समावेश होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: priyanka chopra jonas looks worst in embroidered jacket BAFTA 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.