ठळक मुद्दे2018 मध्ये डिसेंबर महिन्यात प्रियंका व निक लग्नबंधनात अडकले होते. जोधपूरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता.  

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या संसारात आनंदी आहेत. अधूमधून प्रियंका सोशल मीडियावर ट्रोल होते.  प्रियंका व निक यांच्या वयात 10 वर्षांचे अंतर आहे. निक हा प्रियंकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. प्रियंका-निकच्या लग्नाला 1 वर्ष झाले पण आजही वयातील फरकावरून दोघांना ट्रोल केले जाते. प्रियंकाने अनेकदा यावरून ट्रोलर्सला फटकारले आहे. पण निक आजपर्यंत यावर काहीही बोलला नव्हता. पण आता  या ट्रोलिंगवर निक जोनस पहिल्यांदाच बोलला आहे .

निक सध्या सिंगिंग रिअलिटी शो ‘द वॉइस’ या शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. या शोमध्ये आणखी एक जज आहे तिचे नाव आहे कॅली क्लार्कसन. कॅली आणि निक एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत. त्यामुळे शो च्या सेटवर नेहमीच धम्माल गप्पा होत असतात.

अशात कॅलीला निकची मस्करी करण्याची हुक्की आली. ‘माझे वय 37 आहे, तुझे कदाचित 27 आहे ना? असा प्रश्न तिने निकला केला. निकला तिच्या बोलण्याचा रोख नेमका कळला. मग काय, त्याने कॅलीला असे काही उत्तर दिले की, शोमध्ये उपस्थित प्रेक्षक टाळ्या वाजवताना दिसले.


‘माझी पत्नी देखील 37 वर्षांची आहे. मला याने काहीही फरक पडत नाही,’असे निक म्हणाला. त्याच्या या उत्तरावर सगळ्यांच्याच टाळ्या पडल्या.  
2018 मध्ये डिसेंबर महिन्यात प्रियंका व निक लग्नबंधनात अडकले होते. जोधपूरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता.  

Web Title: priyanka chopra husband nick jonas reaction on age difference-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.