priyanka chopra husband nick jonas new song what a man gotta do by jonas brother released | हे काय? पॅन्ट न घालताच नाचला निक जोनास, प्रियंकाला आवरेना हसू

हे काय? पॅन्ट न घालताच नाचला निक जोनास, प्रियंकाला आवरेना हसू

ठळक मुद्देयापूर्वी जोनास बद्रर्सचे ‘Sucker’ हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याला लोकांची उत्स्फूर्त पसंती लाभली होती.

प्रियंका चोप्राचा पती निक जोनासच्या ‘जोनास ब्रदर्स’ या बँडचे आणखी एक गाणे अखेर रिलीज झाले आणि रिलीज होताच चर्चेत आले. तसे रिलीजपूर्वी अनेक दिवसांपासून या गाण्याची चर्चा होती. प्रियंकाने What A Man Gotta Do या गाण्याचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. काही तासांपूर्वी हे गाणे रिलीज झाले आणि   या गाण्यातील प्रियंका व निकचा बोल्ड अंदाज पाहून सगळेच अवाक् झालेत.
गाण्याच्या सुरुवातीला निक जोनास पँट न घालता केवळ शर्ट घालून डान्स करताना दिसतो आणि त्याचा तो अवतार पाहून प्रियंकाला हसू आवरेनासे होते. या संपूर्ण गाण्यात निक प्रियंकाला  इंप्रेस करताना दिसतो. त्याचा भाऊ जो जोनास हाही त्याची वाईफ सोफी टर्नरसोबत डान्स करताना दिसतो.

गाण्यातील चौघांची केमिस्ट्री अफलातून आहे. पण सगळ्यांत अफलातून आहे तो निकचा सुरुवातीचा डान्स. सुरुवातीला निक फक्त शर्ट घालून डान्स करतो आणि शेवटी प्रियंकाही केवळ शर्ट घालून पतीसोबत थिरकते.
यापूर्वी जोनास बद्रर्सचे ‘Sucker’ हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याला लोकांची उत्स्फूर्त पसंती लाभली होती. या गाण्यातही जोनास ब्रदर्स आपआपल्या पत्नींसोबत थिरकताना दिसले होते.


2017 मध्ये प्रियंका व निक यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले आणि दुस-याच वर्षी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. जोधपूरच्या उमेद भवन येथे 1 व 2 डिसेंबर 2018 रोजी दोघांचा रॉयल विवाह सोहळा पार पडला होता. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. हे लग्न इतके रॉयल होते की, या एकाच लग्नातून उमेद भवन हॉटेलची तीन महिन्यांची कमाई झाली होती. प्रियंका व निकचे लग्न 2018 मधील सर्वाधिक चर्चित लग्न होते. म्हणूनच या दोघांच्या संगीत सेरेमनीवर आता एक वेबसीरिज बनतेय.  ही सीरिज अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज केली जाईल.  एक सेलिब्रिटी आपल्या लग्नाचे खासगी क्षण सीरिजरूपात प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याची ही पहिली वेळ असेल.

Web Title: priyanka chopra husband nick jonas new song what a man gotta do by jonas brother released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.