priyanka chopra husband nick jonas gets little hot and teases fans says this is cheating | प्रियंका चोप्राचा नवरा ‘शर्टलेस’ झाला; अन् चाहते म्हणाले, आमच्यासोबत धोका झाला...!!

प्रियंका चोप्राचा नवरा ‘शर्टलेस’ झाला; अन् चाहते म्हणाले, आमच्यासोबत धोका झाला...!!

ठळक मुद्दे2017 मध्ये प्रियंका व निक यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले आणि दुस-याच वर्षी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

इंटरनॅशनल सेलिब्रिटी बनलेली प्रियंका चोप्रा सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतेच. पण तिचा पती आणि अमेरिकन सिंगर निक जोनासचीही चर्चा कमी नाही. होय, निक आणि प्रियंका दोघेही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. नुकताच निकने एक व्हिडीओ शेअर केला आणि त्याचा हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल झाला. पण हे काय? हा व्हिडीओ पाहून चाहते निराशही झालेत. निकने आमच्यासोबत धोका केला, अशा काय काय मजेदार प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्यात.

तर निकने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर ‘सिल्हूट’ चॅलेंज पूर्ण करणारा व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओच्या सुरुवातीला निक जबरदस्त पोज देताना दिसतोय. यानंतर तो टी-शर्ट उतरवायला लागतो. पण अचानक लाईट चेंज होते आणि निकच्या जागी दुसराच कोणी शर्टलेस अवस्थेत दिसतो. निकने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी फनी कमेंट्स केल्या आहेत.
या चॅलेंजच्या माध्यमातून निकचा हॉट लूक पाहायला मिळणार, अशी अपेक्षा असताना निकने भलतेच केले. यामुळे ही शुद्ध फसवणूक आहे, असे एका चाहत्याने लिहले. हा तर अन्याय आहे, असे अन्या एका चाहत्याने लिहिले आहे.

2017 मध्ये प्रियंका व निक यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले आणि दुस-याच वर्षी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. जोधपूरच्या उमेद भवन येथे 1 व 2 डिसेंबर 2018 रोजी दोघांचा रॉयल विवाह सोहळा पार पडला होता. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. हे लग्न इतके रॉयल होते की, या एकाच लग्नातून उमेद भवन हॉटेलची तीन महिन्यांची कमाई झाली होती. प्रियंका व निकचे लग्न 2018 मधील सर्वाधिक चर्चित लग्न होते.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: priyanka chopra husband nick jonas gets little hot and teases fans says this is cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.