कोरोना व्हायरसच्या विरोधात चाललेल्या लढाईसाठी प्रियंका चोप्राने आपलं मदत कार्य सुरु ठेवले आहे. देशातील पीएम केअर फंडसह अनेक संस्थेसाठी तिने मदतीचा हात पुढे दिला आहे. प्रियंका आज आणखी एक संस्थेला आर्थिक मदत केली आहे. 


प्रियंकाने बॉन विव नावाच्या संस्थेला 76 लाखांची मदत केली आहे. सोशल मीडियावर या गोष्टीची माहिती देताना प्रियंका म्हणाली, ''मी आणि निक या संस्थेला लाखो डॉलर डोनेट करत आहोत. ही मदत त्या महिलांसाठी आहे ज्या या संकटाच्या काळातसुद्धा पुढे चालत आहेत. जर तुम्ही कोणत्या अशा महिलेला ओळखत असला तर तिची गोष्ट आम्हाला सांगा. आपल्याला अशा महिलांचा सन्मान केला पाहिजे. आपण अशा महिलांसाथ दिली पाहिजे तेव्हा त्या पुढे जाऊ शकतील.'' या मोहिमेद्वारे प्रियंका प्रत्येक आठवड्यात चार महिलांची गोष्ट लाईव्ह सांगणार आहे.     


 बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा, वरुण धवन, शिल्पा शेट्टी, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, क्रिती सॅनन यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली आहे.

Web Title: Priyanka chopra help for corona virus throughout the world gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.