प्रियंका चोप्रा आता एक ग्लोबल स्टार आहे. अलीकडेच तिने त्याच्या एका हॉलिवूड सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय प्रियंकाचे लवकरच एक पुस्तक बाजारात येणार आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आणि सांगितले की भारतीय असल्याने अमेरिकेत तिला रंगभेदाचा सामना करावा लागला होता.

 प्रियंका 12 वर्षांची होती, तेव्हा ती अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. ती आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत बराच काळ राहिली. त्या काळात शाळेची मुले प्रियंकाला त्यांच्या रंगामुळे त्रास देत असत आणि तिला ब्राऊनी म्हणून आवाज द्यायचे. 

प्रियंकाने सांगितले की, 'जेव्हा मी अमेरिकेच्या शाळेत शिकत होतो तेव्हा मला खूप अस्वस्थ करायचे. मुलं मला ब्राऊनी म्हणून चिडवायचं आणि मला माझ्या  देशात परत जायला सांगायचे.  मला सांगितलं जायचं  की तू ज्या हत्तीवर बसून आली आहेस त्यावर बसूनच परत जा. हळूहळू माझा आत्मविश्वास कमी होत गेला. '


वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियंकाचा ‘द व्हाईट टायगर’ आज रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त त्याने नुकताच टेक्स्ट फॉर यू या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मॅट्रिक्स 4 हा आणखी एक चित्रपट आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka chopra faced racism as a student in the us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.