priyanka chopra cousin and actress meera chopra finds maggots in her food in hotel | OMG! प्रियंका चोप्राच्या बहिणीच्या जेवणात सापडले जिवंत किडे!

OMG! प्रियंका चोप्राच्या बहिणीच्या जेवणात सापडले जिवंत किडे!

ठळक मुद्दे  मीरा लवकरच ‘सेक्शन 375’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ऋचा चड्ढा  आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोसकडून एका पंचतारांकित हॉटेलने 2 केळींसाठी 442 रूपये वसूल केले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता पंचतारांकित हॉटेलचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. होय, एका अभिनेत्रीला एका पंचतारांकित हॉटेलात धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. होय, तिला हॉटेलमधील जेवणात वळवळणारे जिवंत किडे सापडले. ही अभिनेत्री कोण तर प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रा.
मीरा अहमदाबादेतील एका पंचतारांकित हॉटेलात मुक्कामाला होती. यादरम्यान मीराने हॉटेलची पोलखोल केली. याबद्दलचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘ अहमदाबादच्या डबल ट्री हेल्टनहॉटेलात मुक्कामाला असताना मी सकाळचा नाश्ता ऑर्डर केला. मात्र त्यात जिवंत अळ्या आढळल्या. अशा हॉटेलांसाठी लोक वाट्टेल तसे पैसे मोजतात. पण जेवणात मात्र किडे निघतात,’ असे तिने या व्हिडीओत म्हटले आहे.

या व्हिडीओत तिच्या प्लेटमधील अन्न आणि त्यातले जिवंत किडे स्पष्ट दिसत आहेत.


  मीरा लवकरच ‘सेक्शन 375’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ऋचा चड्ढा  आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. मीराने दाक्षिणात्य चित्रपटांतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 2014 मध्ये शरमन जोशीच्या ‘1920 लंडन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2016 मध्ये ती ‘गँग आॅफ घोस्ट’ या चित्रपटात झळकली.

Web Title: priyanka chopra cousin and actress meera chopra finds maggots in her food in hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.