देसी गर्ल प्रियंका चोप्राची स्टाइल आणि ग्लॅमरमध्ये कोणाशीच बरोबरी होऊ शकत नाही. याचा अंदाज तिचे नवीन फोटोशूट पाहून लावू शकतो. प्रियंकाने नुकतेच लाल रंगाच्या आउटफिटमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिचा या आउटफिटमधील अदा चाहत्यांना खूप भावतो आहे. तिने हे आउटफिट नवरा निक जोनसचा म्युझिक अल्बम स्पेसमॅनच्या प्रमोशनसाठी परिधान केला होता. या दरम्यान तिचे फोटोशूट झाले आणि त्यावर सगळ्यांचे लक्ष होते. तिच्या अंगाला चिटकलेला बॉडीफिट ड्रेसची चर्चा अमेरिकन मीडियातही चर्चेत आला आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियंका चोप्राच्या लाल रंगाच्या या आउटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो क्लिक करण्यात आले. तिने स्वतःचीच नाही तर नवरा निक जोनसचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. प्रियंकाचा नवरा आणि अमेरिकन सिंगर निक जोनसचा म्युझिक अल्बम स्पेसमॅनबद्दल सांगायचे तर निकने सोशल मीडियावर बरेच पोस्ट शेअर केले आहेत. 


प्रियंकाने स्पेससूटमध्ये फोटो शेअर करत लिहिले की, अभिनंदन निक. मला माहित आहे की तुझ्यासाठी हे किती जवळचे आहे आणि ज्याप्रकारे तू माझ्यावर प्रेम दाखवतो त्यासाठी मी आभारी आहे. ही अल्बम कलेचा एक नजराणा आहे. माझ्या तुझ्यावर प्रेम आहे.


प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतीच ती राजकुमार रावसोबतच ‘द व्हाईट टायगर’मध्ये दिसली.

आता तिच्याकडे हॉलिवूडचे दोन सिनेमे आहेत.

लवकरच ती सॅम ह्यूएन आणि सेलिन डायॉनसोबत ‘टेक्स्ट फॉर यू’आणि कियानू रीव्ससोबत ‘मॅट्रिक्स 4’ या सिनेमात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Chopra appeared on the street in a different incarnation at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.