प्रियंका-निकनं विकत घेतलं ७ बेडरूम अन् ११ बाथरूम असलेलं घर, किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 06:51 PM2019-11-14T18:51:56+5:302019-11-14T18:52:17+5:30

प्रियंका व निक जोनसने विकत घेतलेल्या नव्या घराची किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवाक्

Priyanka Chopra And Nick Jonas Spent 20 Million Dollors For A Property In Los Angeles America | प्रियंका-निकनं विकत घेतलं ७ बेडरूम अन् ११ बाथरूम असलेलं घर, किंमत ऐकून व्हाल थक्क

प्रियंका-निकनं विकत घेतलं ७ बेडरूम अन् ११ बाथरूम असलेलं घर, किंमत ऐकून व्हाल थक्क

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते. त्यात आता प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. प्रियंका व निक जोनसने अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथे नवीन घर विकत घेतले आहे. या घराची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
 
प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांनी नुकतंच लॉस अँजेलिसमध्ये १४४ कोटी रुपयांचं एक घर विकत घेतलं आहे. हे घर खरेदी करतानाच प्रियंकानं तिथल्या रिअल स्टेटमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे. 


वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार प्रियांका आणि निकनं खरेदी केलेली ही प्रॉपर्टी २०,००० स्क्वेअर फुटांची आहे. ज्यासाठी त्यांना २० मिलियन डॉलर म्हणजेच १४४ कोटी रुपये खर्च करावे लागले. 

सुत्रांच्या माहितीनुसार निक-प्रियंकाच्या या नव्या घरात ७ बेडरूम, ११ बाथरूम आणि बराच मोठा मोकळा पॅसेज आहे. 


प्रियंकाने हे घर ज्या भागात घेतलं आहे त्याच भागात सोफी टर्नरचंही घर आहे. ज्यात ११ बेडरूम आणि १४ बाथरूम आहेत.

मागच्या काही काळापासून निक आणि प्रियंका त्याच्या घरासाठी चांगली जागा शोधत असल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वी व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रियंकानं स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता.


पती निक जोनाससाठी नवं घर खरेदी करणं आणि आई होणं या दोन गोष्टी माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये असल्याचं तिनं म्हटलं होतं. माझ्यासाठी ती जागा घर आहे. जिथे मी खूश आहे असंही तिनं यावेळी सांगितलं होतं.

Web Title: Priyanka Chopra And Nick Jonas Spent 20 Million Dollors For A Property In Los Angeles America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.