Priyanka Chopra and Nick Jonas shared this video on social media | प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली मोठी खुशखबरी, निक जोनससोबत करणार ही घोषणा

प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली मोठी खुशखबरी, निक जोनससोबत करणार ही घोषणा

बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या चर्चेत येते आहे. प्रियंकाने नुकतीच आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. प्रियंका सध्या नवरा निक जोनससोबत क्वॉलिटी टाइम व्यतित करत आहे आणि ते सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. नुकतेच प्रियंकाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात निक जोनसदेखील दिसतो आहे. व्हिडीओत प्रियंकाने सांगितले की, लवकरच होणाऱ्या ९३व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये नॉमिनेशन्सची घोषणा करणार आहे.


व्हिडीओत प्रियंका चोप्रा खूप खूश दिसत होती. ती व्हिडीओत बोलते आहे की, आम्ही ऑस्कर नामांकन जाहीर करत आहोत. मला सांगितल्या शिवाय आम्ही ऑस्कर नॉमिशन्सची घोषणा करणार आहोत. आम्हाला लाइव्ह पहा. व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये प्रियंका चोप्राने अकादमीला टॅग करत लिहिले की, काय कोणती संधी आहे का की मी ऑस्कर नामांकनची घोषणा एकटी करू शकते? त्यानंतर तिने लिहिले, मस्करी करते आहे.


जगातील सर्वात लोकप्रिय अवॉर्डचा सोमवारी दोन भागात ऑस्कर नॉमिनेशनचे लाइव्ह प्रेझेन्टेशन होणार आहे. यात २३ वेवगेगळ्या विभागात नामांकन होणार आहे.नॉमिनेशनचे प्रसारण Oscars.com, Oscars.org आणि अकॅडमीचे डिजिटल प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर ग्लोबल लाइव्ह प्रसारण होणार आहे.


जगातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळा उशीरा होत आहे. हा सोहळा फेब्रुवारीत पार पडतो. मात्र यावेळी हा पुरस्कार २६ एप्रिलला होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियंका चोप्रा द व्हाइट टायगर चित्रपटातून एक दोन नामांकन जाहीर करू शकते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Chopra and Nick Jonas shared this video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.