Priyaka Chopra Get Special Birthday wish from Manasi naik | ‘देसी गर्ल’ला ‘रिक्षावाला गर्ल’कडून वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा, पिग्गी चॉप्सच्या या चित्रपटातील लूकद्वारे बर्थडे विश…...
‘देसी गर्ल’ला ‘रिक्षावाला गर्ल’कडून वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा, पिग्गी चॉप्सच्या या चित्रपटातील लूकद्वारे बर्थडे विश…...

देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिचा आज ३७वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त देसी गर्लवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फॅन्ससह सेलिब्रिटींकडून पिग्गी चॉप्सला शुभेच्छा देण्यात येत आहे. मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिनंही आपल्या लाडक्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खास आणि तितक्याच हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मानसीने ट्विटरवर खास फोटो शेअर करून प्रियंकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये मानसी प्रियंकाच्या गाजलेल्या बर्फी चित्रपटातील लूकमध्ये पाहायला मिळत आहे.  


'बर्फी' चित्रपटात प्रियंकाने झिलमिल ही विशेष व्यक्तीची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आपल्या आवडत्या नायिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मानसीने हुबेहूब झिलमिलसारखा अवतार केला आहे. या फोटोसह मानसीने तिच्या भावनाही शेअर केल्या आहेत. “मला माहिती आहे की तू जितक्या प्रभावीपणे झिलमिल साकारली तशी मी काही साकारलेली नाही. मात्र तू माझ्यासाठी अनेक अर्थाने प्रेरणेचा स्त्रोत आहे.  


वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियंका” अशा शब्दांत मानसीने पिग्गी चॉप्सला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. मानसीचा हा अनोखा अंदाज तिच्या काही फॅन्सना आवडला असून त्यांच्याकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. मात्र काही फॅन्सना मानसीचा हा लूक आवडला नसल्याचंही पाहायला मिळत आहे. तरीही मानसीच्या या हटके प्रयत्नांचं नक्कीच कौतुक व्हायला हवं.. 


Web Title: Priyaka Chopra Get Special Birthday wish from Manasi naik
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.