ठळक मुद्देप्रियासोबत लग्न करण्यापूर्वी जॉन बिपाशासोबत तब्बल दहा वर्षे  रिलेशनशिपमध्ये होता.

बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहम आज (7 जून) आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय. जॉनला आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलणे आवडत नाही. त्यामुळे जॉनच्या सोशल अकाऊंटवर त्याच्या पर्सनल लाईफशी संबंधित एकही फोटो वा व्हिडीओ दिसत नाही. पण जॉनची पत्नी प्रिया रूंचाल ही मात्र थोडी वेगळी आहे. आज लग्नाच्या वाढदिवसाशी तिने पती जॉनला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियाने जॉनसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. यातला जॉन व प्रियाचा रोमॅन्टिक अंदाज बघण्यासारखा आहे.


जॉन व प्रियाच्या लग्नाला आज पाच वर्षे पूर्ण झालीत. 2014 मध्ये जॉनने अगदी गुपचूप प्रियासोबत लग्न केले होते. या लग्नात इंडस्ट्रीतील अगदी मोजके लोक हजर होते. २०१३ मध्ये मुंबईतील एका जिममध्ये प्रिया व जॉनची पहिली भेट झाली होती. यानंतर काहीच महिन्यांत जॉनने लग्नाचा निर्णय घेतला आणि  2014 मध्ये सीक्रेट मॅरेज करून मोकळे झाला.  एक्स गर्लफ्रेन्ड बिपाशा बासू हिलाही त्याने कानोकान खबर लागू दिली नव्हती. जॉनच्या सीक्रेट मॅरेजनंतर बिपाशा व जॉन यांचे ब्रेकअप झाल्याचे जगाला कळले.


 बिपाशापासून दूर झाल्यानंतर जॉनने   प्रिया रुंचालशी गुपचुपपणे लग्न केले होते. सुरुवातीला ही अफवा असल्याचे मानले गेले. परंतु, नंतर जॉनच्या  एका ट्विटने सर्व काही स्पष्ट केले. 
२०१४ मध्ये जॉन अब्राहमने ट्विट केले. ‘आपणास २०१४च्या शुभेच्छा. यावर्षी आपल्या आयुष्यात प्रेम, चांगले भविष्य आणि आनंद घेऊन येवो. लव्ह, जॉन आणि प्रिया अब्राहम’ असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले होते. जॉनचे हे ट्विट पाहून त्याने सीक्रेट मॅरेज केल्याचे सगळ्यांना कळले. बिपाशासाठी तर हा फार मोठा धक्का होता.


प्रियासोबत लग्न करण्यापूर्वी जॉन बिपाशासोबत तब्बल दहा वर्षे  रिलेशनशिपमध्ये होता. बिपाशा एका मुलाखतीत यावर बोलली होती. माझ्यासाठी या ब्रेकअपमधून बाहेर येणे कठीण होते. अचानक मला आमच्यात तिसरी व्यक्ती असल्याचे कळले , असे ती म्हणाली होती.
जॉनची पत्नी प्रिया एक बँकर आहे. जॉनप्रमाणेच प्रियाही लाईमलाईटपासून दूर असते. प्रिया एक प्रायव्हेट पर्सन आहे आणि तिची हीच गोष्ट मला आवडते, असे जॉन अलीकडे एका मुलाखतीत म्हणाला होता.

Web Title: priya runchal wished her husband john abraham on their 5th marriage anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.