नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. प्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमीट तिचे फोटो शेअर करत असते.

प्रिया सध्या पत्नी शंतून मोघे सोबत हिमाचल प्रदेशमध्ये व्हॅकेशन करते आहे. तिथले फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करते आहे. पॅराग्लायडिंग करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत. एका व्हिडीओत ती बर्फात  खेळताना दिसते आहे. प्रियाचे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या फॅन्सना आवडले आहेत.  


'तू तिथे मी' या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.


प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं.

Web Title: Priya marathe enjoying vacation with husband shantanu moghe in himachal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.