Pregnant kareena kapoor khan shared a beautiful picture looked very happy | Video : प्रेग्नेंन्सी अशा पद्धतीने एन्जॉय करते अभिनेत्री करिना कपूर, दिसली खूपच आनंदी

Video : प्रेग्नेंन्सी अशा पद्धतीने एन्जॉय करते अभिनेत्री करिना कपूर, दिसली खूपच आनंदी

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या आपली प्रेग्नेंन्सी एन्जॉय करते आहे. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आपल्या व्हॅनिटी वॉनमधून वाकून बघते आहे. या व्हिडीओ शेअर करताना करिनाने लिहिले, ''आता तुम्ही बघता आहेत, आता तुम्ही मला नाही बघू शकत.'' करिना या व्हिडीओत खूपच खुश दिसतो आहे. यात तिने सफेद रंगाचा शर्ट आणि ऑफ-व्हाईट रंगाचा स्कर्ट घातला आहे. 


करिना कपूरने अलीकडेच 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण झाल्यावर करिनाने एका पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ''मी लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण केले. कठीण काळ होता मी प्रेग्नेंन्सी, भीती, मात्र यासगळ्या गोष्टी माझ्या ध्येयाला थांबवू शकल्या नाहीत. मी शूटिंग पूर्ण केले. सर्व काळजी घेत. आमिर खान आणि अव्दैत चंदन यांचे आभार. धन्यवाद टीम.'' असे या पोस्टमध्ये करिनाने लिहिले होते. 

करिनासोबत या सिनेमाची शूटिंग आमिर खान करत होता. 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. आधी हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pregnant kareena kapoor khan shared a beautiful picture looked very happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.