Prateik Babbar trolled for sharing a topless picture with Wife Sanya Sagar | स्मिता पाटीलच्या मुलाने पत्नीसोबतचा फोटो केला होता शेअर, उठली होती प्रचंड टीकेची झोड, फोटो पाहून आजही होतो चाहत्यांचा संताप

स्मिता पाटीलच्या मुलाने पत्नीसोबतचा फोटो केला होता शेअर, उठली होती प्रचंड टीकेची झोड, फोटो पाहून आजही होतो चाहत्यांचा संताप

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर यानं 23 जानेवारी 2019 गर्लफ्रेंड सान्या सागरशी लग्न केलं होतं. प्रतीक आणि सान्या एकमेकांना १० वर्षांपासून ओळखतात. मात्र २०१७ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. बॉलिवूडच्या बहुचर्चित लग्नांपैकी हे एक लग्न होतं. पण आता एका वर्षातच या दोघांमध्ये  ऑल वेल नसल्याचं बोललं जात आहे.  लग्नाच्या काही दिवसांनंतर या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. 

मराठमोळ्या पद्धतीने  हे लग्न पार पडले होते. या फोटोंवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सतत हे दोघे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. मात्र एका फोटोमुळे प्रतिकवर चांगलीच टीकेची झोड उठली होती. प्रतिकने पत्नी सान्याबरोबर एक प्रायव्हेट फोटो व्हॅलेंटाई डेच्या दिवशी शेअर केला होता. हा सेमी न्यूड फोटो होता. हा फोटो पाहून चाहत्यांचा राग अनावर झाला आणि नको नको त्या कमेंटस करत आपली भडास नेटीझन्स काढत होते. प्रतीक आणि सान्या यांच्या मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.

प्रतिक बब्बर पत्नी सान्या सागर हिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. प्रतिकनं त्यांच्या हानीमूनचे फोटोही इन्स्टाग्रामवरून डिलिट केले आहेत. तसेच सान्याला अनफॉलोही केले आहे. यावर दोघांनी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले नसले तरीही सान्याने दिलेल्या एका मुलाखीतत त्यांच्या नात्यात कटुता आल्याचे संकेतच दिले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prateik Babbar trolled for sharing a topless picture with Wife Sanya Sagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.