ठळक मुद्देसान्या ही मूळची लखनौची आहे.

बॉलिवूडसाठी घटस्फोट नवीन नाहीत. आता आणखी एका बॉलिवूड कपलचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. होय, अभिनेते राज बब्बर व बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर यांच्या वैवाहिक आयुष्यात फार काही ऑल वेल नसल्याचे कळतेय. गतवर्षी 23 जानेवारीला प्रतिकने सान्या सागर हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. पण लग्नानंतर वर्षभरातच प्रतिक व सान्या एकमेकांपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे.
सध्या देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात कपल्सला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. पण प्रतिक व सान्या गेल्या काही दिवसांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. स्पॉटबॉयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार, प्रतिक व सान्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. यामुळे अलीकडे बब्बर कुटुंबाच्या कुठल्याही फॅमिली फंक्शनमध्ये सान्या हजर नव्हती. नुकताच सान्याच्या नाटकाचा प्रयोग झाला. यात सान्या महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. पण सान्याने तिच्या नाटकाच्या प्रयोगालाही पती प्रतिकला बोलवले नव्हते. यापूर्वी सान्या व प्रतिक दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. प्रतिकने तर सान्यासोबतचे सगळे रोमॅन्टिक फोटोही आपल्या अकाऊंटवरून डिलीट केले आहेत. अर्थात अद्याप प्रतिक व सान्या याबद्दल बोलायला तयार नाहीत.\

लग्नाआधी अनेक वर्षे प्रतिक व सान्या एकमेकांचे चांगले मित्र होते. लग्नाआधी  8 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. 2017मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले. 2018 मध्ये प्रतिकने सान्याला लग्नाची मागणी घातली. यानंतर 22 जानेवारी 2018 ला दोघांचा साखरपुडा पार पडला होता आणि यानंतर बरोबर वर्षभराने दोघांनी लग्न केले होते.

सान्या ही मूळची लखनौची आहे. सान्या साखरपुड्याच्या सहा महिन्यांपूर्वीच लंडनहून पोस्ट गॅज्युएशन करून परतली होती. सान्या ही पेशाने रायटर, डायरेक्टर व एडिटर आहे. ती एका बसपा नेते पवन सागर यांची मुलगी आहे. पवन सागर हे बसपा प्रमुख मायावतींचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जाते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prateik Babbar, Sanya Sagar living separately after one year Marriage On The Rocks-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.