ठळक मुद्देप्रतिक व सान्या गत ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. २०१७ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले. गतवर्षी प्रतिकने सान्याला लग्नाची मागणी घातली.

काँग्रेसचे दिग्गज नेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर काल २३ जानेवारीला गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला. अतिशय जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लखनौत हा विवाह सोहळा पार पडला. तूर्तास या लग्नसोहळ्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

नववधूच्या पोशाखात सान्या अतिशय सुंदर दिसतेय तर नवदेवाच्या पोशाखात प्रतिक बब्बर याचा थाटही पाहण्यासारखा आहे. मराठी रितीरिवाजानुसार  पार पडलेल्या या लग्नसोहळ्यासाठी प्रतिक व सान्या दोघांनीही लाल रंगाचे वेडिंग आऊटफिट निवडले. 

या लग्नात प्रतिकचे वडिल राज बब्बर सहभागी झालेत की नाही, तूर्तास याबाबत अधिकृत माहिती नाही. येत्या महिन्यात काँग्रेसच्या एका मोठ्या रॅलीमुळे ते अतिशय व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नानंतर मुंबईत प्रतिक व सान्याचे ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे. या रिसेप्शनला बॉलिवूड व राजकारणातील तमाम दिग्गज हजेरी लावतील.

प्रतिक व सान्या गत ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. २०१७ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले. गतवर्षी प्रतिकने सान्याला लग्नाची मागणी घातली. यानंतर गतवर्षी २२ जानेवारीला दोघांचा साखरपुडा पार पडला होता. सान्या ही मूळची लखनौची आहे.  सान्या ही पेशाने रायटर, डायरेक्टर व एडिटर आहे. एका राजकीय नेत्याची मुलगी असलेली सान्या साखरपुड्याच्या सहा महिन्यांपूर्वीच लंडनहून पोस्ट गॅज्युएशन करून परतली होती.  
प्रतीकने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, ‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला. पण या चित्रपटांना फार यश मिळू शकले नाही.  लवकरच प्रतीकचा ‘छिछोरे’ हा चित्रपट रिलीज होतोय.  
 

Web Title: Prateik Babbar gets married to girlfriend Sanya Sagar in an intimate ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.