ठळक मुद्देगेल्या आठ वर्षांपासून सान्या व प्रतीक एकमेकांना ओळखतात. पण गत दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सान्या ही मूळची लखनौची आहे.

अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर आज गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. होय, गतवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्ताला म्हणजेच २२ जानेवारीला प्रतीक व सान्याचा साखरपुडा झाला होता. यानंतर बरोबर वर्षभरानी प्रतीक व सान्या लग्नाच्या आणाभाका घेतील. लखनौ येथे काल २२ जानेवारीपासून हळद आणि मेहंदी अशा लग्नाच्या विधींना सुरूवात झाली. तूर्तास या दोन्ही सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत प्रतिक व सान्या दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत.


गेल्या आठ वर्षांपासून सान्या व प्रतीक एकमेकांना ओळखतात. पण गत दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सान्या ही मूळची लखनौची आहे. सान्या ही पेशाने रायटर, डायरेक्टर व एडिटर आहे. एका राजकीय नेत्याची मुलगी असलेली सान्या साखरपुड्याच्या सहा महिन्यांपूर्वीच लंडनहून पोस्ट गॅज्युएशन करून परतली होती.


प्रतीकने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, ‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला. पण या चित्रपटांना फार यश मिळू शकले नाही.
आॅगस्ट २०१७मध्ये प्रतीकने त्याच्या व्यसनाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. मी ड्रग्जच्या अधीन गेलो होतो, असे त्याने सांगितले होते. मी माझ्या आयुष्यात बरीच उलथापालथ झालेली बघितली. फर्स्ट इयरला असताना मित्रांनी माझी ड्रग्जशी ओळख करून दिली आणि मी या गर्तेत सापडलो. अपयश आणि अभिनेत्री एमी जॅक्सनसोबतच्या ब्रेकअपमुळे मी हतबल झालो होतो. यातूनच मी ड्रग्जच्या आहारी गेलो. पण आता मी यातून पूर्णपणे बाहेर आलोय. आता माझा सर्व फोकस माझ्या कामावर असणार आहे, असे प्रतीकने सांगितले होते. लवकरच प्रतीकचा ‘छिछोरे’ हा चित्रपट रिलीज होतोय.

Web Title: Prateik Babbar and Sanya Sagar wedding see haldi and mehendi ceremony pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.