मुंबई एअरपोर्टवर प्राची देसाई दिसली व्हीलचेअरवर, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 06:06 PM2021-01-16T18:06:33+5:302021-01-16T18:07:00+5:30

अभिनेत्री प्राची देसाई नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. मात्र तिला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का बसला.

Prachi Desai was seen in a wheelchair at the Mumbai airport | मुंबई एअरपोर्टवर प्राची देसाई दिसली व्हीलचेअरवर, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

मुंबई एअरपोर्टवर प्राची देसाई दिसली व्हीलचेअरवर, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

Next

बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाई नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. मात्र तिला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का बसला. प्राची विमानतळावर व्हीलचेअरवर दिसली. तिच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला चालता येत नाही. 

प्राची देसाईच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला चालता येत नाही. त्यामुळे मुंबई एअरपोर्टवर ती व्हीलचेअरवर दिसली. तिला असे पाहून चाहत्यांना धक्का बसला.  या दरम्यान, प्राचीने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती. प्राचीचे हे व्हीलचेअरवरील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत आणि चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत आणि प्रार्थना करत आहेत. 

प्राची देसाईने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. ‘झलक दिखला जा’,‘सीआयडी’ या शो मध्येही ती झळकली होती. द कपिल शर्मा शो आणि नागीनमध्येही प्राची दिसली होती.


तर तिने २००८ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. फरहान अख्तरच्या ‘रॉक ऑन’मध्ये ती झळकली आणि यानंतर प्राचीने कधीही मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात तिने फरहानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर लाईफ पार्टनर, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, तेरी मेरी कहानी, बोल बच्चन, पुलिसगिरी, आय मी और मैं अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prachi Desai was seen in a wheelchair at the Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app